मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian Railway : रेल्वेत ५ वर्षापर्यंतच्या मुलांना लागणार तिकीट? रेल्वे मंत्रालयाने दिले उत्तर

Indian Railway : रेल्वेत ५ वर्षापर्यंतच्या मुलांना लागणार तिकीट? रेल्वे मंत्रालयाने दिले उत्तर

Aug 18, 2022, 04:13 PM IST

    • Railway ministry : रेल्वे प्रवासादरम्यान लहान मुलांसाठी वेगळे तिकिट बुक करणे सक्तीचे असल्याचा वृत्ताचे रेल्वे मंत्रालयाने खंडन केले आहे. मंत्रालयाने म्हटले की, नियमात असा कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
रेल्वेत ५ वर्षापर्यंतच्या मुलांना लागणार तिकीट?

Railwayministry : रेल्वे प्रवासादरम्यान लहान मुलांसाठी वेगळे तिकिट बुक करणे सक्तीचे असल्याचा वृत्ताचे रेल्वे मंत्रालयाने खंडन केले आहे. मंत्रालयाने म्हटले की, नियमात असा कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

    • Railway ministry : रेल्वे प्रवासादरम्यान लहान मुलांसाठी वेगळे तिकिट बुक करणे सक्तीचे असल्याचा वृत्ताचे रेल्वे मंत्रालयाने खंडन केले आहे. मंत्रालयाने म्हटले की, नियमात असा कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

रेल्वे मंत्रालयाने बुधवारी एक निवेदन जारी करत रेल्वे प्रवासादरम्यान लहान मुलांसाठी वेगळे तिकिट बुक करणे सक्तीचे असल्याचा वृत्ताचे खंडन केले. मंत्रालयाने म्हटले की, नियमात असा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, एक ते चार वर्षे वयाच्या मुलांसाठी रेल्वे प्रवासादरम्यान वेगळे तिकिट काढावे लागले. मात्र मंत्रालयाने या वृत्तांचे खंडन करून या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Viral news : पाचवीच्या विद्यार्थ्यावर शिक्षिका करत होती बलात्कार! आईने पकडले रंगेहात! काही दिवसात होणार होते लग्न

Elon Musk : इलॉन मस्कचा भारतीयांना दणका! ३० दिवसांत १.८५ लाखांहून अधिक 'एक्स' अकाऊंट बंद! 'ही' चूक करणे टाळा

बर्ड फ्लूचे संकट! केरळनंतर उत्तराखंडमध्ये अलर्ट जारी, प्रत्येक जिल्ह्यातील पक्षांचे नमुने तपासणार

ट्रकच्या धडकेत नोटांच्या बंडलांनी भरलेला 'छोटा हत्ती' पलटला, रस्त्यावर पसरले ७ कोटींची रक्कम

रेल्वे  मंत्रालयाने म्हटले की, प्रवाशांना पाच वर्षाहून कमी वयाच्या मुलांचे वेगळे तिकीट तेव्हाच काढावे लागेल ज्यावेळी त्यांना स्वंतत्र बर्थ पाहिजे. रेल्वेने म्हटले की, जर त्यांना वेगळा बर्थ नको असेल तर पाच वर्षाहून कमी वयाच्या मुलांना मोफत प्रवास आहे. जसा यापूर्वी होता. 

६ मार्च, २०२० च्या  सर्कुलरनुसार रेल्वे मंत्रालयाने पुढे म्हटले की, पाच वर्षाहून कमी वयाच्या मुलांना मोफत प्रवास आहे. मंत्रालयाने म्हटले की, जर ५ वर्षाहून कमी वयाच्या मुलांसाठी बर्थ/सीटची मागणी केली गेल्यास सामान्य तिकीट दराप्रमाणे त्यांना वेगळी तिकीट खरेदी करावी लागेल. 

यापूर्वी समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी रेल्वेत पाच वर्षाहून कमी वयाच्या मुलांचे वेगळे तिकीट घेण्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, रेल्वे आता गरीबांसाठी नाही. आता लोक भाजपचे संपूर्ण तिकीट कापतील.

पुढील बातम्या