मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi On RSS: खाकी परिधान करतात २१ व्या शतकातील कौरव; राहुल गांधींचा संघावर पुन्हा घणाघात

Rahul Gandhi On RSS: खाकी परिधान करतात २१ व्या शतकातील कौरव; राहुल गांधींचा संघावर पुन्हा घणाघात

Jan 09, 2023, 09:47 PM IST

  • Rahul Gandhi On RSS : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर हल्लाबोल केला. राहुल गांधी म्हणाले की, २१ व्या शतकातील कौरव खाकी परिधान करतात व शाखा भरवतात.

राहुल गांधींचा आरएसएसवर पुन्हा घणाघात

Rahul Gandhi On RSS : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर हल्लाबोल केला. राहुल गांधी म्हणाले की, २१ व्या शतकातील कौरव खाकी परिधान करतात व शाखा भरवतात.

  • Rahul Gandhi On RSS : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर हल्लाबोल केला. राहुल गांधी म्हणाले की, २१ व्या शतकातील कौरव खाकी परिधान करतात व शाखा भरवतात.

आरएसएसला २१व्या शतकातील कौरव म्हणत राहुल गांधींनी (Rahul gandhi) संघावर मोठा हल्ला चढवला आहे. राहुल म्हणाले की, आजचे कौरव खाकी हाफ पँट घालतात,हातात काठ्या घेतात आणि शाखा भरवतात. राहुल गांधी एवढ्यावरच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले की, त्यांच्यासोबत दोन-तीन श्रीमंत अब्जाधीश कौरवांच्या पाठीशी उभे आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली भारत जोडो यात्रा सोमवारी सायंकाळी अंबाला जिल्ह्यात पोहोचली. येथे पोहोचल्यानंतर एका सभेला संबोधित करताना गांधी म्हणाले की, हरियाणा ही महाभारताची भूमी आहे. यावेळी राहुल यांनी आरएसएस आणि सरकारवर निशाणा साधला.

ट्रेंडिंग न्यूज

Attack on Israel : राफाहवर हल्ल्यापूर्वी इस्रायलवर इस्लामिक संघटनेने डागले क्षेपणास्त्र; युद्धाची तीव्रता वाढणार

Viral news: हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या जेवणात मिसळत होता प्रायव्हेट पार्ट अन् करत होता लघवी! वेटरचे घाणेरडे कृत्य

Viral news : पाचवीच्या विद्यार्थ्यावर शिक्षिका करत होती बलात्कार! आईने पकडले रंगेहात! काही दिवसात होणार होते लग्न

Elon Musk : इलॉन मस्कचा भारतीयांना दणका! ३० दिवसांत १.८५ लाखांहून अधिक 'एक्स' अकाऊंट बंद! 'ही' चूक करणे टाळा

चुकीचा जीएसटी कोणी लावला?
यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी नोटाबंदी आणि जीएसटीबाबत सवाल उपस्थित केले. नोटाबंदी कोणी केली, चुकीचा जीएसटी कोणी लागू केला, कोणासाठी आणि कोणाच्या विरोधात केला,हेही समजून घ्यायला हवे, असा सवाल काँग्रेस खासदार राहुल यांनी केला. राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदींनी नोटाबंदी आणि चुकीच्या जीएसटीवर सही केली. भारतातील दोन-तीन अब्जाधीशांसाठी पंतप्रधान सत्ता चालवतात. नोटाबंदी किंवा जीएसटी चुकीचा निर्णय पांडवांनी घेतला होता का? ते कधी असे करतील का?

आजही युद्ध सुरू आहे -

राहुल गांधी म्हणाले, लोकांना हे समजत नाही, पण आज युद्ध असेच होते. ते कोणाच्या दरम्यान आहे? पांडव कोण होते? अर्जुन, भीम... ते तपश्चर्या करायचे. पांडवांनी या पृथ्वीतलावर द्वेष पसरवल्याचे आणि निरपराधांवर काही गुन्हा केल्याचे लोकांनी कधी ऐकले आहे का,असा सवाल काँग्रेस नेत्याने केला. ते म्हणाले की,एका बाजूला हे पाच तपस्वी होते आणि दुसऱ्या बाजूला झुंडशाही. पांडवांसोबत सर्व धर्माचे लोक होते. या भारत जोडो यात्रेप्रमाणेच, ज्यामध्ये तो कोठून आला हे कोणी विचारत नाही. हे प्रेमाचे दुकान आहे.पांडव अन्यायाविरुद्ध उभे राहिले, त्यांनीही द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडले होते.

त्यामुळेच संघवाले हर हर महादेव म्हणत नाहीत -
हरियाणाच्या कुरुक्षेत्रात संघावर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, आरएसएसचे लोक हर हर महादेव कधीच म्हणत नाहीत. यामागचे कारण सांगताना काँग्रेस खासदार म्हणाले की, भगवान शिव हे तपस्वी आहेत. ते म्हणाले की,हे लोक भारताच्यातपस्येवर आघात करत आहेत. राहुल पुढे म्हणाले की, संघाच्या लोकांनी जय सिया राममधून माता सीतेचे नाव काढून टाकले.हे लोक खरे तर भारतीय संस्कृतीच्या विरोधात काम करत आहेत.

 

 

पुढील बातम्या