मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा गौतम अदानींवर १२ हजार कोटींच्या चोरीचा थेट आरोप

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा गौतम अदानींवर १२ हजार कोटींच्या चोरीचा थेट आरोप

Oct 18, 2023, 04:37 PM IST

  • Rahul Gandhi on Gautam Adani : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांच्यावर आता थेट चोरीचा आरोप केला आहे.

Rahul Gandhi (AFP)

Rahul Gandhi on Gautam Adani : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांच्यावर आता थेट चोरीचा आरोप केला आहे.

  • Rahul Gandhi on Gautam Adani : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांच्यावर आता थेट चोरीचा आरोप केला आहे.

Rahul Gandhi on Gautam Adani : विदेशातील बनावट कंपन्या आणि शेअरच्या किंमतींच्या मुद्द्यावरून अदानी समूहाला लक्ष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज गौतम अदानी यांच्यावर थेट चोरीचा आरोप करून खळबळ उडवून दिली. ‘कोळशाच्या किंमती फुगवून अदानी यांनी देशातील जनतेच्या खिशातून १२ हजार कोटी रुपये काढले आहेत. ही सरळ-सरळ चोरी आहे,' असा आरोप राहुल गांधी यांनी आज केला.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसला घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलते होते. राहुल गांधी यांनी यावेळी लंडनच्या ‘फायनान्शियल टाइम्स’ या वृत्तपत्रातील लेखच पत्रकारांना दाखवला. 'कोळशाच्या चढ्या किंमतींचं रहस्य आणि अदानी' अशा शीर्षकाखाली हा लेख आहे. याचाच संदर्भ देत राहुल यांनी गौतम अदानी यांच्यावर आरोप केले. तसंच, केंद्र सरकारवरही निशाणा साधला.

'गौतम अदानी यांची कंपनी इंडोनेशियामध्ये कोळसा खरेदी करते. हा कोळसा भारतात येईपर्यंत त्याची किंमत दुप्पट होते. अशा पद्धतीनं अदानी यांनी जवळपास १२ हजार कोटी रुपये कमावले आहेत. कोळशाच्या चुकीच्या किंमती दाखवून आणि हा दर वाढवून भारतात विजेचे दर वाढवले जातात. देशातील नागरिकांचं वीज बिल जे सातत्यानं वाढत आहे, त्याच कारण गौतम अदानी हे आहेत. लोकांच्या खिशातील हे पैसे अदानी यांच्या खिशात जात आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

अदानींच्या घोटाळ्याचा आकडा आता ३२ हजार कोटी झालाय!

लंडनच्या वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी आली आहे. ही बातमी एखादं सरकार पाडू शकते. कारण जो माणूस ही चोरी करतोय, त्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा-पुन्हा वाचवत आहेत. देशातील एकही वर्तमानपत्र किंवा वृत्तवाहिनी या बातम्या दाखवत नाहीत, याबद्दल राहुल गांधी यांनी आश्चर्य व्यक्त केलं. यापूर्वी आम्ही २० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. आता त्यात १२ हजार कोटींची भर पडली आहे. त्यामुळं ही रक्कम आता ३२ हजार कोटी रुपये झाली आहे.

पुढील बातम्या