मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Russia Opposition Leader : तुरुंगात कैद असलेल्या रशियाच्या विरोधी पक्षनेत्याचा जेलमध्ये मृत्यू

Russia Opposition Leader : तुरुंगात कैद असलेल्या रशियाच्या विरोधी पक्षनेत्याचा जेलमध्ये मृत्यू

Feb 16, 2024, 07:30 PM IST

  • जेलमध्ये बंद असलेला रशियाचा विरोधी पक्षनेता अॅलेक्सी नवालनी याचे निधन झाल्याचे वृत्त आहे. 

Russian opposition leader Alexei Navalny is seen on a screen via video link from the IK-2 corrective penal colony in Pokrov in May 2022. (Reuters)

जेलमध्ये बंद असलेला रशियाचा विरोधी पक्षनेता अॅलेक्सी नवालनी याचे निधन झाल्याचे वृत्त आहे.

  • जेलमध्ये बंद असलेला रशियाचा विरोधी पक्षनेता अॅलेक्सी नवालनी याचे निधन झाल्याचे वृत्त आहे. 

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन याचे प्रखर टीकाकार आणि विरोधी पक्षनेते अलेक्सी नवालनी (वय ४७) यांचे कारागृहात निधन झाल्याचे वृत्त आहे. नवालनी यांच्या निधनाच्या वृत्ताने रशियामध्ये खळबळ उडाली आहे. यामालो-नेनेट्स प्रांताच्या तुरुंग अधिकाऱ्यांने ही माहिती दिली. ‘नवालनी चालत असताना त्यांना त्रास होत होता. ते जवळजवळ बेशुद्ध झाले होते. लगेच रुग्णवाहिका पथकाला पाचारण करण्यात आले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल झाले केले. त्यांच्यावर लगेच उपचार करण्यात आले. परंतु त्याचा सकारात्मक परिणाम झाला नाही.’ असं जेलच्या निवेदनात म्हटले आहे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अलेक्सी नवालनी यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. नवालनी यांच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला याची कारणे शोधली जात आहेत. अॅलेक्सी नवालनी यांचे प्रेस सचिव तसेच सहकाऱ्यांकडून मृत्युच्या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. 'अॅलेक्सीचे वकील खार्प येथील कारागृहाला लवकरच भेट देणार आहेत. त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती मिळताच देण्यात येईल' असं कारण नवालनी यांचे सहकारी किरा यार्मेश यांनी सांगितले.  

ट्रेंडिंग न्यूज

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

Viral News: पोटच्या ३ वर्षाच्या मुलीला कारमध्येच विसरले; २ तासानंतर पालकांच्या लक्षात आलं, तोपर्यंत…

Madhavi Raje Scandia : राजमाता माधवी राजे सिंधिया यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, अनेक नेते उपस्थित

अॅलेक्सी नवालनींना दुसऱ्या तुरुंगात हलवण्याविषयी प्रश्नचिन्ह

अलेक्सी नवालनींवर रशिया सरकारकडून दहशतवाद्याचा आरोप लावण्यात आला होता. या आरोपाखाली त्यांना १९ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. डिसेंबर २०२३ मध्ये त्यांना मध्य रशियाच्या व्लादिमीर भागातील तुरुंगातून मॉस्कोपासून १९०० किलोमीटर दूर ईशान्येला असलेल्या खार्प या शहरात 'आयके-३' या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि  कुख्यात गुन्हेगारांना डांबून ठेवण्यात येणाऱ्या तुरुंग वसाहतीत हलविण्यात आले होते. हा तुरुंग रशियातील सर्वात कडेकोड बंदोबस्त असलेला कुख्यात तुरुंगांपैकी एक मानला जातो. बहुतांश गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आलेले आरोपी येथे डांबले जातात.

व्हिडिओ कॉलमध्ये काय म्हणाले होते अॅलेक्सी नवालनी 

रशियाच्या उत्तर भागात असलेल्या आर्क्टिकच्या बर्फाळ प्रदेशात असलेल्या तुरुंगात स्थलांतरित केल्यानंतर नवालनी यांनी डिसेंबर महिन्यात सहकाऱ्यांना एक व्हिडिओ कॉल केला होता. या व्हिडिओमध्ये अॅलेक्सी नवालनी चांगल्या मनस्थितीत दिसून आले होते. ‘मी फार लांब असल्यामुळे मला अद्याप ख्रिसमसचा मेल मिळालेला नाही’ अशी गंमत त्यांनी या व्हिडिओ संदेशात केली होती.

पुतिन यांना देण्यात आली नवालनींच्या मृत्यूची माहिती 

रशियन सरकारच्या क्रेमलिनकडून या वृत्तावर पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. 'अलेक्सी नवालनी यांच्या मृत्यूच्या कारणांबाबत रशियन सरकारकडे कोणतीही माहिती नाही. परंतु तुरुंगात सर्व तपासण्या करण्यात येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना नवालनी यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे' असे क्रेमलिनने म्हटले आहे.

पुढील बातम्या