मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभागातील मराठी माणसांचं दुःख पंतप्रधान मोदींकडे मांडणार

महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभागातील मराठी माणसांचं दुःख पंतप्रधान मोदींकडे मांडणार

Dec 30, 2022, 05:20 PM IST

  • पंतप्रधान मोदी पुढच्या महिन्यात बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी सीमाभागातील मराठी बांधवांवर कन्नडिगांकडून होण्याच्या अन्याय व अत्याचाराची माहिती मोदींच्या कानावर घालणार असल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीने दिली आहे.

पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी पुढच्या महिन्यात बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी सीमाभागातील मराठी बांधवांवर कन्नडिगांकडून होण्याच्या अन्याय व अत्याचाराची माहिती मोदींच्या कानावर घालणार असल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीने दिली आहे.

  • पंतप्रधान मोदी पुढच्या महिन्यात बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी सीमाभागातील मराठी बांधवांवर कन्नडिगांकडून होण्याच्या अन्याय व अत्याचाराची माहिती मोदींच्या कानावर घालणार असल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीने दिली आहे.

महाराष्ट्राच्या विधमंडळात कर्नाटक सीमावादासंदर्भात ठराव मंजूर झाल्यानंतर कर्नाटक सरकारचा व नेत्यांचा जळफळाट सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यानंतर आता अन्य मंत्रीही महाराष्ट्राबाबत बेताल वक्तव्ये करत आहेत. दोन्ही राज्यांमधील चिघळलेला सीमावाद अमित शहा यांच्या मध्यस्तीनंतर देखील संपलेला नाही. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Ebrahim raisi Dead : इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू! १७ तासानंतर सापडले हेलिकॉप्टर

EPFO ने क्लेम सेटलमेंट प्रक्रिया केली अधिक सुलभ! नॉमिनीला आधार तपशीलाशिवायही मिळणार PF रक्कम

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या सीमावादावरून मोदींच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या अनेक दशकांपासून कर्नाटक सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून अन्याय, अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे आता सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिकांचे दुःख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घालण्याचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीने घेतला आहे. त्यामुळे बेळगाव कारवार निपाणीसह सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिकांचे दुःख आणि कन्नडिगांकडून केला जाणारा अन्यायाची माहितीही पंतप्रधानांना सांगणार असल्याचे समितीने म्हटले आहे. 

काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील ४० गावे व  सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर दावा केल्यानंतर सीमावाद उफाळला होता. त्यानंतर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील अनेक वाहनांची तोडफोड केली होती. 

पुढील बातम्या