मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  PM Surya Ghar : ३०० युनिट पर्यंत मोफत वीज आणि सब्सिडी मिळवायचीय?; असा करा अर्ज

PM Surya Ghar : ३०० युनिट पर्यंत मोफत वीज आणि सब्सिडी मिळवायचीय?; असा करा अर्ज

Feb 19, 2024, 03:54 PM IST

  • How to Application PM Surya Ghar Scheme : देशातील १ कोटी घरांना मोफत वीज देण्यासाठी मोदी सरकारनं पीएम सूर्यघर योजना सुरू केली आहे. या माध्यमातून प्रत्येक महिन्याला ३०० युनिट वीज मोफत मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करावा लागेल.

PM Surya Ghar Scheme

How to Application PM Surya Ghar Scheme : देशातील १ कोटी घरांना मोफत वीज देण्यासाठी मोदी सरकारनं पीएम सूर्यघर योजना सुरू केली आहे. या माध्यमातून प्रत्येक महिन्याला ३०० युनिट वीज मोफत मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करावा लागेल.

  • How to Application PM Surya Ghar Scheme : देशातील १ कोटी घरांना मोफत वीज देण्यासाठी मोदी सरकारनं पीएम सूर्यघर योजना सुरू केली आहे. या माध्यमातून प्रत्येक महिन्याला ३०० युनिट वीज मोफत मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करावा लागेल.

PM Surya Ghar Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतेच प्रत्येक महिन्याला ३०० यूनिट पर्यंत फ्री वीज (Free Bijli Yojana) देण्यासाठी पीएम सूर्य घर: मोफत वीज योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील एक कोटी कुटुंबांना लाभ दिला जाईल. या योजनेसाठी केंद्र सरकार ७५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार लाभार्थ्यांना सब्सिडीही देणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

तुमच्या घरावर सोलर पॅनल इंस्‍टॉल केल्यानंतर सरकारकडून सब्सिडी दिली जाईल. घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्यासाठी तुम्हाला  https://pmsuryaghar. gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज (Apply For Free Electricity Scheme) करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 

मोफत वीज योजनेसाठी कसा करावा अर्ज? 

  • सर्वात आधी अधिकृत वेबसाइट https://pmsuryaghar.gov.in वर जाऊन अप्लाय फॉर रूफटॉप सोलर निवडा. 
  • आता आपले राज्य व वीज वितरण कंपनीचे नाव निवडा. त्यानंतर आपला वीज ग्राहक क्रमांक, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी टाका. 
  • त्यानंतर ओपन झालेल्या नव्या पेजवर कंज्यूमर नंबर आणि मोबाइल नंबर टाकून लॉगइन करा. 
  • त्यानंतर फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून रूफटॉप सोलर पॅनलसाठी अर्ज करा.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला फीजिबिलिटी अप्रूव्हल मिळेल. त्यानंतर आपल्या DISCOM सोबत रजिस्टर्ड कोणत्याही वेंडरकडून सोलर प्लाँट इंस्टॉल करू शकाल.
  • सोलर पॅनल इंस्टॉलेशन झाल्यानंतर पुढच्या स्टेपनुसार तुम्हाला प्लाँट डिटेलसोबत नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल. 

याशिवाश मिळणार नाही सब्सिडी –

नेट मीटर इंस्‍टॉल झाल्यानंतर DISCOM कडून पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला कमीशनिंग सर्टिफिकेट जारी केले जाईल. याचा अर्ज तुम्ही या योजनेसाठी अर्ज केलेला आहे. मात्र सब्सिडी घेण्यासाठी तुम्हाला एक डॉक्‍यूमेंट अपलोड करावे लागेल. सर्टिफिकेट जारी झाल्यानंतर पोर्टलवर बँक अकाउंट डिटेल आणि कन्सल चेक जमा करावा लागेल. त्यानंतर तुमच्या बँक खात्यात सबसिडीची रक्कम  जमा होईल.

किती मिळणार अनुदान? 
पीएम सूर्य घर योजना (PM Surya Ghar Yojana) नुसार घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी एकूण ४७ हजार रुपये खर्च येईल. हा खर्च कमी करण्यासाठी सरकार लाभार्थ्यांना अनुदान देईल. हे अनुदान १८००० रुपये असेल. याचा अर्ज लाभार्थ्यांना २९००० रुपये खर्च करावे लागतील.

पुढील बातम्या