मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  PM Modi: मोदींच्या व्हॉट्सअप चॅनलला प्रचंड प्रतिसाद; अवघ्या काही दिवसात 'इतके' फॉलोअर्स

PM Modi: मोदींच्या व्हॉट्सअप चॅनलला प्रचंड प्रतिसाद; अवघ्या काही दिवसात 'इतके' फॉलोअर्स

Sep 25, 2023, 03:47 PM IST

    • PM Modi thanked WhatsApp community: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याच्या व्हॉट्सअप चॅनल फॉलो करणाऱ्या वापरकर्त्यांचे आभार मानले आहेत.
PM Narendra modi

PM Modi thanked WhatsApp community: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याच्या व्हॉट्सअप चॅनल फॉलो करणाऱ्या वापरकर्त्यांचे आभार मानले आहेत.

    • PM Modi thanked WhatsApp community: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याच्या व्हॉट्सअप चॅनल फॉलो करणाऱ्या वापरकर्त्यांचे आभार मानले आहेत.

PM Modi WhatsApp channel: व्हॉट्सअपने नुकतेच त्यांच्या वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअप चॅनल नावाचे धमाकेदार फीचर आणले आहे. या नवीन फीचरच्या मदतीने व्हॉट्सअप वापरकर्ते जगभरातील अनेक सेलिब्रिटीशी थेट जोडले जाऊ शकतात. अनेकांनी स्वत:चे व्हॉट्सअप चॅनल देखील सुरु केले आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वत:चे व्हॉट्सअप चॅनल सुरु केले. ज्याला देशभरातील नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या काही दिवसांतच लाखो लोकांनी नरेंद्र मोदींच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो केले आहे. अशा फॉलोअर्सचे मोदींनी आभार मानले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

पंतप्रधान मोदींनी त्यांचे व्हॉट्सअप चॅनल सुरु करून आठवडा उलटला नाही तोच, ५ दशलक्ष लोकांनी त्यांच्या चॅनलला फॉलो केले आहे. दरम्यान, मोदींनी त्यांच्या व्हॉट्सअप चॅनेलला फॉलो केलेल्या फॉलोअर्स मनापासून आभार मानले आहे. एवढेच नव्हेतर, मोदी हे व्हॉट्सअप चॅनलवर सर्वाधिक आणि जलद फॉलो करणारे जागतिक नेते ठरले आहेत.

व्हॉट्सअप चॅनल सुरु करण्यासाठी तुमच्याकडे व्हॉट्सअप बिझनेस अकाऊंट असणे गरजेचे आहे. तसेच तुमचे व्हॉट्सअप अपडेट असणे आवश्यक आहे. दरम्यान व्हॉट्सअप चॅनल सुरु करण्याची सोपी पद्धत जाणून घेऊयात.

व्हॉट्सअप चॅनल सुरु करण्याची पद्धत:

- सर्वप्रथम व्हॉट्सअप उघडा.

- त्यानंतर अपडेट टॅबवर जा, आयकॉनवर क्लिक करा.

- याठिकाणी न्यू चॅनल पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा.

- यानंतर Get Started पर्याय दिसेल, यात दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

- चॅनलला नाव देऊन अकाऊंट तयार करा.

- यानंतर चॅनल कस्टमाईज करण्याचा पर्याय उपलब्ध होईल.

विभाग

पुढील बातम्या