मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  PM Modi Speech : माणिपूरच्या धगधगत्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोडले मौन, म्हणाले...

PM Modi Speech : माणिपूरच्या धगधगत्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोडले मौन, म्हणाले...

Aug 15, 2023, 09:05 AM IST

    • PM Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. यावेळी २१ तोफांची सलामी देण्यात आली. देशाला संबोधित करतांना त्यांनी मणीपुरचा उल्लेख केला.
Prime Minister Narendra Modi (PTI)

PM Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. यावेळी २१ तोफांची सलामी देण्यात आली. देशाला संबोधित करतांना त्यांनी मणीपुरचा उल्लेख केला.

    • PM Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. यावेळी २१ तोफांची सलामी देण्यात आली. देशाला संबोधित करतांना त्यांनी मणीपुरचा उल्लेख केला.

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. यावेळी २१ तोफांची सलामी देण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली. तसेच विकसित भारत बनविण्याचा संकल्प देखील त्यांनी केला. या सोबतच त्यांनी मणीपुर हिंसचारावर देखील भाष्य केले. मोदी म्हणाले, मणीपुर येथे शांतता असून येथील समस्येवर तोडगा हा शांतेच्या माध्यमातून काढला जाईल असे मोदी म्हणाले.

ट्रेंडिंग न्यूज

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

७७ स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधानांकडून विकसित भारत बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत,मणिपूर, शेतकरी, शेजारी राष्ट्रांबद्दलचं धोरण यावरून केली. त्यांनी मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार असे मोदी या वेळी म्हणाले.

Pune Metro : पुणेकरांसाठी खुशखबर ! पुणे मेट्रो धावणार सकाळी ६ पासून; अजित पवारांच्या सुचनेनंतर निर्णय

लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान मोदी म्हणाले, 'विशेषतः मणिपूरमधील हिंसाचाराच्या काळात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. आई आणि मुलींच्या इज्जतीशी खेळले. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे. ईशान्येकडील राज्यात आता शांतता आहे. यासोबतच त्यांनी शांततेने समस्येवर तोडगा काढण्याचे बोलले आहे.

लाल किल्यावरून पंतप्रधान मोदी म्हणाले, 'विशेषतः मणिपूरमधील हिंसाचाराच्या काळात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. आई आणि मुलींच्या इज्जतीशी खेळले. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे. ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारे मणिपूरचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने काम करत आहेत.

Google, Independence Day : स्वातंत्र्याच्या रंगात रंगले Google, बनवले ‘हे’ खास डूडल

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे. यावर तोडगा शांततेनेच शोधला जाऊ शकतो. ते म्हणाले की, मणिपूरच्या जनतेने काही दिवसांपासून जी शांतता राखली आहे ती पुढे नेली पाहिजे.

मणिपूरवर राजकारण

मणिपूरमधील हिंसाचारावर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बराच गदारोळ झाला होता. I.N.D.I.A. या नवीन आघाडीसह अनेक विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदींना संसदेत जाऊन निवेदन देण्याची मागणी केली होती. पंतप्रधानांच्या वक्तव्यासाठी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावही आणल्याचे बोलले जात होते. पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच पीएम मोदींनी महिलांवरील हिंसाचाराच्या विरोधात कारवाई करण्याची भाषा केली होती.

 

बदलत्या जगाला भारत आकार देणार

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी म्हणाले, आज देशातील तरुणांना जेवढे भाग्य लाभले आहे तेवढे क्वचितच कुणाला मिळते. आपण ते गमावू नये. येणारा काळ हा तंत्रज्ञानाच्या प्रभावाचा असणार आहे. देशात संधींची कमतरता नाही. आपल्याला पाहिजे तितक्या संधी देण्याची क्षमता या देशामध्ये आहे.

पुढील बातम्या