मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  2000 Note: ‘मुळातच मोदींना पसंत नव्हती २००० ची नोट, त्यामुळे..’ पंतप्रधानांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितली अंदर की बात!

2000 Note: ‘मुळातच मोदींना पसंत नव्हती २००० ची नोट, त्यामुळे..’ पंतप्रधानांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितली अंदर की बात!

May 20, 2023, 08:04 PM IST

  • 2000 currency note : दोन हजाराच्या नोटा चलनातून बंद करणे आधीपासूनच नियोजित होते. नोटबंदीच्या काळात तात्पुरत्या व्यवस्थेसाठी ही नोट चलनात आणली गेली होती, अशी माहिती मोदींच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे.

नरेंद्र मोदी

2000 currency note : दोन हजाराच्या नोटा चलनातून बंद करणे आधीपासूनच नियोजित होते.नोटबंदीच्या काळात तात्पुरत्या व्यवस्थेसाठी ही नोट चलनात आणली गेली होती, अशी माहिती मोदींच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे.

  • 2000 currency note : दोन हजाराच्या नोटा चलनातून बंद करणे आधीपासूनच नियोजित होते. नोटबंदीच्या काळात तात्पुरत्या व्यवस्थेसाठी ही नोट चलनात आणली गेली होती, अशी माहिती मोदींच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे.

नवी दिल्ली - दोन हजाराच्या नोटा चलनातून बंद करणे आधीपासूनच नियोजित होते. नोटबंदीच्या काळात तात्पुरत्या व्यवस्थेसाठी ही नोट चलनात आणली गेली होती. पंतप्रधान मोदींचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा (Nripendra Misra) यांनी शनिवारी ही माहिती दिली. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जेव्हा नोटाबंदी (Demonetisation) झाली होती, त्यावेळी नृपेंद्र मिश्रा मोदींचे प्रधान सचिव होते. नोटाबंदीच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा समावेश होता त्याचबरोबर नोटाबंदीच्या मागील हेतुबाबतही त्यांना कल्पना होती. २,००० रुपयांची नोट आता सर्कुलेशनमधून बाहेर काढल्यानंतर त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

दोन हजाराची नोट व्यावहारिक चलन मानत नव्हते मोदी -
मिश्रा यांनी म्हटले की, पीएम मोदी नेहमी असे मानत होते की, दोन हजाराची नोट दैनंदिन व्यवहारासाठी व्यवहार्य चलन नाही. त्याचबरोबर हे चलन काळा पैसा व करचोरीस पायबंद घालण्यात उपयोगी ठरत नाही. पंतप्रधान मोदी नेहमी छोट्या किंमतीच्या नोटांना व्यावहारिक चलन मानतात. दोन हजार रुपयांची नोट चलनातून परत घेणे पंतप्रधानांच्या मॉड्यूलर बिल्डिंग एप्रोचला दर्शवतो. याची सुरुवात २०१८-१९ मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यापासून झाली होती. त्यानंतर ही नोट चलनातून हळू-हळू बाहेर होत गेली. आता ३० सप्टेंबर २०२३ रोजी हे नोट पूर्णपणे बंद केली जाईल.

२०१८ पासूनच बंद आहे छपाई -

आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई वर्ष २०१८-१९ पासूनच बंद करण्यात आली होती. दोन हजार रुपयांची नोट आरबीआय एक्ट १९३४ च्या सेक्शन २४ (१) नुसार चलनात आणली गेली होती. जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर अर्थव्यवस्थेवरील भार कमी करण्यासाठी या नोटा छापण्यात आल्या होत्या. आता ५००, २०० आणि १०० च्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याने २ हजाराची मोठी नोट चलनात आणल्याचा उद्देश्य यशस्वी झाला आहे.

२ हजार रुपयांच्या नोटांचे सर्कुलेशन थांबवणे नोटबंदीहून वेगळे आहे. अर्थसचिव टी वी सोमनाथन यांनी म्हटले की, आरबीआयचा हा निर्णय नोव्हेंबर २०१६ मध्ये घेतलेल्या निर्णयाहून भिन्न आहे. याचा अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होणार नाही.

पुढील बातम्या