मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  PM Narendra Modi: नियम म्हणजे नियम! PM मोदींनी गुडघे टेकून मागितली माफी, VIDEO VIRAL

PM Narendra Modi: नियम म्हणजे नियम! PM मोदींनी गुडघे टेकून मागितली माफी, VIDEO VIRAL

Oct 01, 2022, 10:09 AM IST

    • PM Narendra Modi: राजस्थानमध्ये एका सभेच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यासपीठावर गुडघे टेकून सभेला उपस्थित असणाऱ्यांची माफी मागितली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभेला उपस्थित असणाऱ्यांची मागितली माफी

PM Narendra Modi: राजस्थानमध्ये एका सभेच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यासपीठावर गुडघे टेकून सभेला उपस्थित असणाऱ्यांची माफी मागितली.

    • PM Narendra Modi: राजस्थानमध्ये एका सभेच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यासपीठावर गुडघे टेकून सभेला उपस्थित असणाऱ्यांची माफी मागितली.

PM Narendra Modi: शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजस्थानमध्ये रॅली होती. पण त्यांना रॅलीमध्ये वेळेत पोहोचता आलं नाही. पंतप्रधान मोदी जेव्हा रॅलीच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते आणि मोठ्या संख्येने लोक त्यांचे भाषण ऐकण्यासाठी उपस्थित होते. तेव्हा मोदींनी व्यासपीठावर बोलताना नियमानुसार माईकवरून भाषण केलं नाही. तसंच उशिर झाल्याबद्दल उपस्थितांची माफीही मागितली. यावेळी मोदींनी गुडघ्यावर बसून वाट पाहणाऱ्या लोकांची माफी मागितली.

ट्रेंडिंग न्यूज

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

मोदी म्हणाले की, मला इथं पोहोचायला उशिर झाला आता दहा वाजले आहेत. माझा आत्मा मला सांगतो की कायदा-नियम पाळले पाहिजेत आणि त्यामुळे मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मात्र तुम्हाला असा विश्वास देतो की पुन्हा इथे येईन आणि तुमचं जे प्रेम आहे ते व्याजासहीत फेडेन.

व्हिडीओमध्ये दिसतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. त्यानंतर गुडघ्यावर बसले आणि पुन्हा हात जोडून माफी मागितली. तसंच व्यासपीठावर डोकंही टेकवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा व्हिडीओ आता वेगाने व्हायरल होत आहे.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णवाहिकेसाठी गाड्यांचा ताफा थांबवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पंतप्रधान मोदींचा ताफा ज्या रस्त्याने जात होता त्याच मार्गावरून एक रुग्णवाहिका जात होती. तेव्हा रुग्णवाहिकेला वाट करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला गाड्यांचा ताफा थांबवण्यास सांगितल्याचं व्हिडीओमध्ये दिसत होतं.

पुढील बातम्या