मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  PM Surya Ghar : पंतप्रधान मोदींकडून ‘पीएम सूर्य घर’ योजनेची घोषणा, दर महिना ३०० यूनिट वीज मिळणार मोफत

PM Surya Ghar : पंतप्रधान मोदींकडून ‘पीएम सूर्य घर’ योजनेची घोषणा, दर महिना ३०० यूनिट वीज मिळणार मोफत

Feb 13, 2024, 05:08 PM IST

  • PM Surya Ghar Yojana : पंतप्रधान मोदींनी 'पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना' जाहीर केली. याअंतर्गत देशातील लोकांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे.

Narendra modi (file Pic)

PM Surya Ghar Yojana : पंतप्रधान मोदींनी 'पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना' जाहीर केली. याअंतर्गत देशातील लोकांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे.

  • PM Surya Ghar Yojana : पंतप्रधान मोदींनी 'पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना' जाहीर केली. याअंतर्गत देशातील लोकांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना प्रत्येक महिन्याला ३०० यूनिटपर्यंत मोफत वीज प्रदान करण्यासाठी मंगळवारी ‘पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना’ जाहीर केली. मोदींनी ‘एक्स’ वर सविस्तर पोस्ट करत म्हटले की, शाश्वत विकास व लोकांच्या हितासाठी पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना सुरू केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

मोदींनी म्हटले की, ७५ हजार कोटींहून अधिक खर्चाच्या या योजनेचा उदेश्य प्रत्येक महिन्याला ३०० यूनिटपर्यंत मोफत वीज पुरवठा करून १ कोटी घरे प्रकाशमान करणे आहे. मोदींनी म्हटले की, लोकांच्या बँक खात्यात थेट पैसे ट्रान्सफरपासून सवलतीच्या दरात बँक कर्ज उपलब्ध करण्याबाबत करणार विचार करत आहे. जेणेकरून या योजनेच्या खर्चाचा बोझ पडणार नाही.

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिर उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद करण्यात आली होती.

 

स्थानिक पातळीवर ही योजना लोकप्रिय करण्यासाठी विविध शहरी संस्था आणि पंचायतींना रुफटॉप सोलर सिस्टीम बसवण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. तसेच या योजनेच्या माध्यमातून लोकांचे वीज बिल कमी होईल आणि रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील. यावेळी पंतप्रधान मोदींनी सौर ऊर्जेचा प्रचार आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी सर्व ग्राहकांना, विशेष करून तरुणांना आवाहन केले की, त्यांनी ‘पीएमसूर्यघर डॉट जीओव्ही डॉट इन’वर अर्ज करून पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना लोकप्रिय करावी.

पुढील बातम्या