मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  MP Plane Crash: मध्य प्रदेशात विमान कोसळले, गुना विमानतळावर उतरताना अपघात; महिला वैमानिक जखमी, VIDEO

MP Plane Crash: मध्य प्रदेशात विमान कोसळले, गुना विमानतळावर उतरताना अपघात; महिला वैमानिक जखमी, VIDEO

Mar 06, 2024, 07:58 PM IST

  • Plane Crash In Madhya Pradesh : मध्यप्रदेशातील गुना विमानतळावर आपात्कालीन लँडिंग करताना विमान कोसळले. या अपघातात महिला वैमानिक जखमी झाली आहे.

मध्य प्रदेशात विमान कोसळले

Plane Crash In Madhya Pradesh : मध्यप्रदेशातील गुना विमानतळावर आपात्कालीन लँडिंग करताना विमान कोसळले. या अपघातात महिला वैमानिक जखमी झाली आहे.

  • Plane Crash In Madhya Pradesh : मध्यप्रदेशातील गुना विमानतळावर आपात्कालीन लँडिंग करताना विमान कोसळले. या अपघातात महिला वैमानिक जखमी झाली आहे.

मध्य प्रदेशमध्ये मोठा अपघात झाला आहे. एक विमान क्रॅश झाला आहे. सांगितले जात आहे की, गुना विमानतळावर विमान कोसळले. विमानाने नीमच शहराहून सागरकडे उड्डाण केले होते. त्यानंतर महिला पालयटने गुना विमानतळावर इमरजन्सी लँडिंगची परवानगी मागितली होती. लँडिंगच्या वेळी विमानाचे संतुलन बिघडले व त्यानंतर विमान कोसळले.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

या अपघातात महिला ट्रेनी पायलट नॅन्सी मिश्रा जखमी झाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार लँडिंगच्या वेळी हे विमान रनवेवरून पुढे गोपालपुराकडे निघून गेले. अपघातानंतर घटनास्थळी फायर ब्रिगेडआणि रुग्णवाहिका रवाना करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे नीमचहून उड्डाण होताच पायलटने गुना विमानतळावर विमानाच्या आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली होती. विमान उतरत असताना असंतुलित झाले व विमान तलावाच्या काठावरील झुडपात कोसळले. जखमी महिला पायलटला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये अपघातग्रस्त विमान दिसत आहे. विमानाचा सांगाडा जमिनीवर पडलेला दिसत आहे. विमान अपघाताच्या कारणाची चौकशी केली जात आहे.

पुढील बातम्या