मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Diwali Gift 2023 : ऐन सणासुदीत कामगारांची लॉटरी, महागड्या गाड्यांचं मिळालं दिवाळी गिफ्ट

Diwali Gift 2023 : ऐन सणासुदीत कामगारांची लॉटरी, महागड्या गाड्यांचं मिळालं दिवाळी गिफ्ट

Nov 04, 2023, 10:33 PM IST

    • Diwali Gift 2023 : दिवाळी निमित्त एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क कारगाड्यांचं गिफ्ट दिलं आहे.
Pharma Company Diwali Gift 2023 (HT)

Diwali Gift 2023 : दिवाळी निमित्त एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क कारगाड्यांचं गिफ्ट दिलं आहे.

    • Diwali Gift 2023 : दिवाळी निमित्त एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क कारगाड्यांचं गिफ्ट दिलं आहे.

Pharma Company Diwali Gift 2023 : दसरा संपल्यानंतर आता दिवाळी काही दिवसांवर येवून ठेपलेली आहे. त्यामुळं अनेकांनी सुट्ट्या टाकत कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्याचं नियोजन आखलं आहे. देशातील अनेक कंपन्या कामगारांना दिवाळीनिमित्त बोनस, गिफ्ट किंवा अन्य प्रकारचे फायदे देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आता हरयाणातील एका कंपनी कामगारांना दिलेली भेटवस्तू पाहून अनेकांना सुखद धक्का बसला आहे. एका फार्मा कंपनीने कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू म्हणून नव्या कोऱ्या कारगाड्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं अनेकांनी कंपनीच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

मिळालेल्या माहितीनुसार, हरयाणातील पंचकुला येथील एका फार्मा कंपनीने १२ कर्मचाऱ्यांना कार भेट दिली आहे. कंपनीने १२ कर्मचाऱ्यांना १२ टाटा पंच कार दिल्या आहे. दिवाळी गिफ्ट देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये एका ऑफिस बॉयचा देखील समावेश आहे. त्यामुळं आता कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त कार चालवण्याचं प्रशिक्षण सुरू केलं आहे. दिवाळीला कार भेट मिळेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. परंतु फार्मा कंपनीने गुडन्यूज देताच १२ कर्मचाऱ्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं आहे. ज्या कर्मचाऱ्यांना फार्मा कंपनीने कार भेट दिली आहे, त्या सर्व कर्मचाऱ्यांनी चालू आर्थिक वर्षात उत्तम कामगिरी केल्याची माहिती आहे.

टाटा कंपनीची पंच कारची किंमत सहा लाखांपासून सुरू होते. म्हणजे कंपनीने अंदाजे ७२ लाख रुपयांचं दिवाळी गिफ्ट १२ कर्मचाऱ्यांना दिलं आहे. दुसरीकडे देशातील आयटी हब असलेल्या पुणे, हैदराबाद, नोएडा आणि बंगळुरू या शहरांतील अनेक कंपन्या दिवाळीला कर्मचाऱ्यांना महागडे गिफ्ट देणार असल्याची चर्चा आहे. परंतु आता त्यापूर्वीच हरयाणातील पंचकुलात १२ कर्मचाऱ्यांना पंच कार दिवाळी गिफ्ट मिळाल्याने त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

 

विभाग

पुढील बातम्या