मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gulab Jamun Video : गुलाबजाम खाण्यासाठी तुफान राडा, लोकांची एकमेकांना धक्काबुक्की; व्हायरल व्हिडिओ पाहिलात का?

Gulab Jamun Video : गुलाबजाम खाण्यासाठी तुफान राडा, लोकांची एकमेकांना धक्काबुक्की; व्हायरल व्हिडिओ पाहिलात का?

Oct 26, 2023, 03:11 PM IST

    • Gulab Jamun Viral Video : एका परातीत ठेवलेले गुलाबजाम खाण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी करत एकमेकांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Gulab Jamun Viral Video In Marathi (HT)

Gulab Jamun Viral Video : एका परातीत ठेवलेले गुलाबजाम खाण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी करत एकमेकांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

    • Gulab Jamun Viral Video : एका परातीत ठेवलेले गुलाबजाम खाण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी करत एकमेकांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Gulab Jamun Viral Video In Marathi : लग्नसोहळा किंवा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात जेवणाची सोय असली की मोठ्या संख्येने लोक गर्दी करत असतात. जेवणात जिलेबी किंवा गुलाबजाम असले की लोक पार तुटून पडतात. कार्यक्रमांमध्ये गोड जेवण असलं की कुणालाही बोलावण्याची गरज पडत नाही. लोक आपोआप कार्यक्रमस्थळी पोहचून फुकटच्या जेवणावर ताव मारतात. असाच काहीसा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये गुलाबजाम खाण्यासाठी लोकांनी जोरदार राडा करत एकमेकांना धक्काबुक्की केल्याचं पाहायला मिळत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमात येणाऱ्या लोकांसाठी गोड जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. काही लोक आनंदाने जेवण करत असतानाच अचानक लोकांची गर्दी गुलाबजामच्या परातीकडे येते. लोक एकमेकांना धक्काबुक्की करत गुलाबजाम फरार करण्यास सुरुवात करतात.

तीन ते चार परातीमध्ये ठेवण्यात आलेले गुलाबजाम काही क्षणात संपत असल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे. त्यामुळं व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त करत गोड गुलाबजामसाठी इतकी गर्दी करायची काय गरज होती?, असा सवाल केला आहे.

काही लोकांनी परातीतून गुलाबजाम लंपास करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या, टिशू पेपर आणि लोखंडी ताटाचा देखील वापर केल्याचं व्हायरल व्हिडिओतून दिसून येत आहे. अनेक लोकांनी या व्हायरल व्हिडिओचा आनंद घेतला असून सोशल मीडियावर शेयर देखील केलं आहे. गुलाबजामसाठी धक्काबुक्की करणाऱ्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं असून हजारोंच्या संख्येने लोकांनी शेयर केलं आहे.

विभाग

पुढील बातम्या