मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sonia Gandhi : काँग्रेसचा महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा, सोनिया गांधी म्हणाल्या “हे तर राजीव गांधींचे स्वप्न..”

Sonia Gandhi : काँग्रेसचा महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा, सोनिया गांधी म्हणाल्या “हे तर राजीव गांधींचे स्वप्न..”

Sep 20, 2023, 03:41 PM IST

  • Sonia Gandhi on women reservation bill : महिला आरक्षण हे राजीव गांधींचं स्वप्न होते असे म्हणत त्यांनी नारीशक्ती वंदन कायद्याला पाठिंबा दिला आहे.

Sonia Gandhi

Sonia Gandhi on women reservation bill : महिला आरक्षण हे राजीव गांधींचं स्वप्न होते असे म्हणतत्यांनीनारीशक्ती वंदन कायद्याला पाठिंबा दिला आहे.

  • Sonia Gandhi on women reservation bill : महिला आरक्षण हे राजीव गांधींचं स्वप्न होते असे म्हणत त्यांनी नारीशक्ती वंदन कायद्याला पाठिंबा दिला आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. काल संसदेत महिला आरक्षण विधेयक सादर केल्यानंतर आज लोकसभेत या विधेयकावर ची माहिती दिल्यानंतर काँग्रेसकडून सोनिया गांधी यांनी यावर प्रतिक्रिया दिली. खासदार सोनिया गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे म्हटले.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: राहुल गांधी फेसबूक, इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना दरवर्षी एक लाख रुपये देणार? वाचा

Afghanistan floods: अफगाणिस्तानमध्ये पावसाचा कहर, पुरात ३०० हून अधिक जणांचा मृत्यू

Attack on Israel : राफावर हल्ल्याआधी इस्लामिक संघटनेने इस्रायलवर डागले क्षेपणास्त्र; युद्ध आणखी भडकणार

Viral news: हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या जेवणात मिसळत होता प्रायव्हेट पार्ट अन् करत होता लघवी! वेटरचे घाणेरडे कृत्य

काँग्रेसकडून सोनिया गांधींनी या विधेयकावर चर्चेची सुरूवात केली. महिला आरक्षण हे राजीव गांधींचं स्वप्न होते असे म्हणत त्यांनी नारीशक्ती वंदन कायद्याला पाठिंबा दिला आहे. परंतु आरक्षणासोबत जातनिहाय जनगणना करण्याची मागणी देखील सोनिया गांधींनी केली आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या, महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा आहे. मी या विधेयकाच्या समर्थनार्थ उभी आहे. माझ्या आयुष्यातील ही एक मोठी गोष्ट आहे. महिलांचा सहभाग सुनिश्चित करणारे पहिले विधेयक माझे पती राजीव गांधी यांनी आणले होते. आज त्याचा परिणाम म्हणजे देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून १५ लाख महिला नेत्या प्रतिनिधीत्व करत आहेत. राजीव गांधींचे स्वप्न अर्धेच पूर्ण झाले, ते या विधेयकाच्या मंजूरीमुळे पूर्ण होणार आहे. काँग्रेस पक्षाचा या विधेयकाला पाठिंबा आहे. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत, पण चिंताही आहे. महिला गेल्या १३ वर्षांपासून राजकीय नेतृत्वाची वाट पाहत आहेत. हे विधेयक तातडीने मंजूर करावे, अशी आमची मागणी आहे.

भारतीय महिलांनी सर्वांच्या कल्याणासाठी काम केले आहे. स्त्रीच्या सहनशीलतेचा अंदाज लावणे खूप कठीण काम आहे. स्त्री कधीही संकटांच्या ओझ्याखाली दबली गेली नाही. कठीण काळात महिलांनी महात्मा गांधी, नेहरू आणि पटेल यांची स्वप्ने पुढे नेली. इंदिरा गांधींचे व्यक्तिमत्त्व हे त्याचे उदाहरण आहे. यासोबतच जातनिहाय जनगणना करून एससी/एसटी/ओबीसी आरक्षण द्यावे. त्यासाठी आवश्यक ती पावले सरकारने उचलावी, अशी मागणी सोनिया गांधींनी व्यक्त केली.

पुढील बातम्या