मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Imran Khan: तोशाखाना प्रकरणात इम्रान खान दोषी; कोर्टाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली

Imran Khan: तोशाखाना प्रकरणात इम्रान खान दोषी; कोर्टाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली

Aug 05, 2023, 04:19 PM IST

  • Toshakhana case: तोशाखाना प्रकरणात दोषी ठरलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Imran Khan (REUTERS)

Toshakhana case: तोशाखाना प्रकरणात दोषी ठरलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

  • Toshakhana case: तोशाखाना प्रकरणात दोषी ठरलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Imran Khan Jailed: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तोशाखाना प्रकरणात इम्रान खानला जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी कोर्टाने त्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यानंतर इस्लामाबाद पोलिसांनी इम्रानला लाहोरमधून अटक केल्याची माहिती समोर आली.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

पाकिस्तामधील मुस्लीम लीग-नवाझ पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारने ऑगस्ट २०२२ मध्ये इम्रान खान यांच्यावर तोशखाना प्रकरणात गुन्हा दाखल केला. पंतप्रधान असताना इम्रान खान यांनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती तोशखाना विभागाकडे उघड केली. या भेटवस्तू बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर करण्यात आला.

न्यायालयाच्या निर्णयानंतर इस्लामाबाद पोलिसांनी पंजाब पोलिसांच्या मदतीने इम्रानला त्याच्या लाहोरच्या राहत्या घरातून अटक केली. इम्रानच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. इम्रानला पंजाबमधील कोट लखपत तुरुंगात नेण्यात आल्याचे त्यांच्या पक्षाने सांगितले. विशेष सहाय्यक शाहबाज शरीफ अत्ताउल्ला तरार यांनी इम्रान खानच्या अटकेला दुजोरा दिला. त्याला रावळपिंडीच्या अदियाला कारागृहात ठेवायचे की इतरत्र, हे नंतर ठरवले जाईल, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून तोशाखाना खटला गेल्या वर्षी दाखल करण्यात आला होता. ईसीपीने यापूर्वी याच प्रकरणात खानला अपात्र ठरवले होते. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी २१ ऑक्टोबर रोजी खान यांना खोटी विधाने आणि खोटी माहिती दिल्याच्या आरोपाखाली सार्वजनिक पदासाठी अपात्र ठरवले होते.

विभाग

पुढील बातम्या