मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Burj Khalifa : आमची हीच औकात उरलीय का?, स्वातंत्र्यदिनी बुर्ज खलिफावर राष्ट्रध्वज न झळकल्याने पाकिस्तानी संतापले

Burj Khalifa : आमची हीच औकात उरलीय का?, स्वातंत्र्यदिनी बुर्ज खलिफावर राष्ट्रध्वज न झळकल्याने पाकिस्तानी संतापले

Aug 15, 2023, 10:23 AM IST

  • Burj Khalifa Dubai : स्वातंत्रदिनाचा जल्लोष करण्यासाठी असंख्य पाकिस्तानी बुर्ज खलिफाबाहेर जमले होते. परंतु यूएई सरकारने त्यांचा घोर अपमान केला आहे.

Pakistani National Flag On Burj Khalifa (HT)

Burj Khalifa Dubai : स्वातंत्रदिनाचा जल्लोष करण्यासाठी असंख्य पाकिस्तानी बुर्ज खलिफाबाहेर जमले होते. परंतु यूएई सरकारने त्यांचा घोर अपमान केला आहे.

  • Burj Khalifa Dubai : स्वातंत्रदिनाचा जल्लोष करण्यासाठी असंख्य पाकिस्तानी बुर्ज खलिफाबाहेर जमले होते. परंतु यूएई सरकारने त्यांचा घोर अपमान केला आहे.

Pakistani National Flag On Burj Khalifa : भारतासह संपूर्ण जगभरात आज भारतीय स्वातंत्रदिन साजरा केला जात आहे. शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालयांसह अनेक ठिकाणी राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं आहे. यापूर्वी सोमवारी म्हणजेच १४ ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी पाकिस्तानी नागरिकांनी दुबईतील बुर्ज खलिफा इमारतीबाहेर एकत्र येत पाकिस्तानचा स्वातंत्रदिन साजरा केला आहे. परंतु यूएईच्या सरकारने पाकिस्तानचा घोर अपमान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बुर्ज खलिफा बिल्डिंगवर राष्ट्रध्वज न झळकावण्यात आल्याने अनेक पाकिस्तानी नागरिकांनी संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं आहे. यासंदर्भातला एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

काल म्हणजेच १४ ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन होता. त्यामुळं संयुक्त अरब अमिराती येथील पाकिस्तानी नागरिकांनी दुबईत ठिकठिकाणी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा केल्याचं पाहायला मिळालं. परंतु स्वातंत्र्यदिनाच्या मध्यरात्री असंख्य पाकिस्तानी नागरिकांनी बुर्ज खलिफाबाहेर गर्दी केली होती. त्यावेळी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज बुर्ज खलिफावर झळकावण्यात येईल, असा त्यांना विश्वास होता. परंतु तसं काही झालंच नाही. मध्यरात्री १२ वाजल्यानंतरही बुर्ज खलिफावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज न झळकल्याने अनेक पाकिस्तानी नागरिकांनी संताप व्यक्त करत बुर्ज खलिफाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुबईत पाकिस्तानचा घोर अपमान झाल्याने अनेकांनी त्यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पाकिस्तानी महिला म्हणतेय की, मध्यरात्री बारा वाजलेले असून दुबईवाल्यांकडून पाकिस्तानचा झेंडा बुर्ज खलिफावर झळकावण्यात येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. आता आमची हीच औकात उरलेली आहे. पाकिस्तानी नागरिक घोषणाबाजी करत असले तरी देखील पाकिस्तानी राष्ट्रध्वज बुर्ज खलिफावर झळकावण्यात येणार नाहीय. सध्या पाकिस्तानी सरकार नागरिकांसोबत करत आहे, तेच आता स्थलांतरीत नागरिकांसोबत व्हायला हवं, असं म्हणत महिलेने व्हिडिओतून संताप व्यक्त केला आहे.

पुढील बातम्या