मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पाकिस्‍तानमध्ये आत्‍मघाती हल्ला; स्फोटकांनी भरलेल्या ट्रकची आर्मीला बेसला धडक, २४ सैनिक ठार

पाकिस्‍तानमध्ये आत्‍मघाती हल्ला; स्फोटकांनी भरलेल्या ट्रकची आर्मीला बेसला धडक, २४ सैनिक ठार

Dec 12, 2023, 04:42 PM IST

  • Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये आर्मी बेसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात २४ सैनिकांचा मृत्यू झाला असून ३४ सैनिक जखमी झाले आहेत.  

Pakistan Terrorist Attack

Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये आर्मी बेसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात २४ सैनिकांचा मृत्यू झाला असून ३४ सैनिक जखमी झाले आहेत.

  • Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये आर्मी बेसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात २४ सैनिकांचा मृत्यू झाला असून ३४ सैनिक जखमी झाले आहेत.  

पेशावर - वायव्य पाकिस्‍तानमध्ये मंगळवारी एक भीषण दहशतवादी हल्ला झाला आहे. सांगितले जात आहे की, हा एक आत्मघाती हल्ला आहे. दहशतवाद्यांनी डेरा इस्माइल खान जिल्ह्यातील  दाराबा परिसरात स्फोटकांनी भरलेली कार आर्मी बेसच्या इमारतीला धडकवली. या हल्ल्यात कमीत कमी दोन डझन सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर ३४ सैनिक जखमी झाले आहेत. डेरा इस्‍माइल खान जिल्ह्यात दहशतवादी कारवाया वाढल्याचे दिसत आहे. हा जिल्हा खैबर पख्‍तून्‍ख्‍वां  जवळ असून हे ठिकाण तेहरीक-ए-तालिबान (टीटीपी) चा गड मानले जाते. 

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

दहशतवाद्यांनी एक स्थानिक पोलीस ठाणे व आर्मी बेसला निशाणा बनवले आहे. या हल्ल्यात २४ सैनिक मारले गेले आहेत. जियो न्‍यूज वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलाने केलेल्या फायरिंगमध्ये चार दहशतवादीही ठार झाले आहेत. यापूर्वी वृत्त आले होते की, या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी ठार झाले आहेत. सैन्य दलातील अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक लोक झोपेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला ते सर्वा सामान्य कपड्यात होते. यामुळे मारले गेलेले सैनिक होते की, सामान्य नागरिक हे निश्चित करणे कठीण आहे.


टीजेपीने घेतली हल्ल्याची जबाबदारी - 
या हल्ल्याची जबाबदारी तेहरीक-ए-जिहाद पाकिस्तान (टीजेपी) संघटनेने घेतली आहे. या संघटनेने पाकिस्तानमध्ये मोठ्या हल्ल्याचा दावा केला होता. संघटनेचे प्रवत्ते मुल्ला कासिम यांनी हा आत्मघाती हल्ला असल्याचे सांगत हा हल्ला मावलवी हसन गंडापुर याने केल्याचे सांगितले. या संघटनेविषयी कोणालाही माहिती नाही. मात्र काही लोक हा टीटीपीचा हिस्सा असल्याचे म्हणतात. मागील वर्षीपासून पाकिस्‍तानमध्ये व विशेष करून खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवादी हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या हल्ल्यांमध्ये प्रांतात कमीत कमी ४७० सुरक्षा कर्मचारी व नागरिकांचा मृत्यू झाला आहे. चालु वर्षात या प्रांतात १०५० दहशतवादी घटना घडल्याचे जियो न्यूजने म्हटले आहे.

पुढील बातम्या