मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : टीव्हीवरील लाइव्ह चर्चेत भिडले दोन पक्षांचे प्रवक्ते; मग लाथा काय आणि बुक्क्या काय?

Viral Video : टीव्हीवरील लाइव्ह चर्चेत भिडले दोन पक्षांचे प्रवक्ते; मग लाथा काय आणि बुक्क्या काय?

Sep 29, 2023, 12:52 PM IST

  • pakistani leaders scuffle in live tv show video viral : पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीवरील लाइव्ह चर्चेत दोन नेत्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

PTI vs PML N

pakistani leaders scuffle in live tv show video viral : पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीवरील लाइव्ह चर्चेत दोन नेत्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

  • pakistani leaders scuffle in live tv show video viral : पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीवरील लाइव्ह चर्चेत दोन नेत्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

Pakistan live Show video viral : पाकिस्तानातील खुनशी राजकारणाचं प्रतिबिंब आता टीव्हीवरील लाइव्ह चर्चेतही पडू लागलं आहे. आतापर्यंत एकमेकांवर शाब्दिक हल्ले करणारे पाकमधील दोन प्रमुख राजकीय पक्षांचे प्रवक्ते नुकतेच टीव्हीवरील एका लाइव्ह कार्यक्रमात चक्क एकमेकांवर तुटून पडले. एकमेकांवर लाथाबुक्क्यांचे प्रहार केले. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

पाकिस्तानातील राजकारण सतत तापलेलं असतं. सध्या इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) आणि नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग - नवाज (पीएमएलएन) या पक्षात जोरदार कुरघोड्या सुरू आहेत. पीएमएल-एन पक्षानं लष्कराच्या मदतीनं इम्रान खान यांची सत्ता उलथवून लावल्यापासून इम्रान खान कमालीचे आक्रमक झाले आहेत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्तेही तितकेच कट्टर आहेत. एकमेकांना मात देण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.

टीव्हीवरील चर्चेत तेच दिसलं. इम्रान खान यांचा प्रवक्ता शेर अफझल खान मारवत आणि शरीफ यांच्या पक्षाचा प्रवक्ता अफनान उल्लाह खान हे दोघे चर्चेत सहभागी झाले होते. एका मुद्द्यावरून त्यांच्या जोरदार वाद झाला. हा वाद शिवीगाळीपर्यंत गेला. त्यामुळं संतापलेले मारवत खान आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी शरीफ यांच्या प्रवक्त्यावर हल्ला चढवला. समोरूनही त्याचा प्रतिकार झाला. एकमेकांना ठोसे आणि लाथा घातल्या. हे सगळं लाइव्ह सुरू होतं. प्रसंगावधान राखून चॅनेलच्या कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला आणि पुढील अनर्थ टळला. हाणामारी थांबल्यानंतरही दोघे एकमेकांना शिव्या घालत होते.

या घटनेवरून आता दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. शरीफ यांच्या प्रवक्त्यानं मारवत यांच्यावर आरोप केला आहे. मी अहिंसा मानणारा व्यक्ती आहे, पण नवाझ शरीफ यांचा सैनिक आहे. मी पीटीआयच्या प्रवक्त्याला दिलेलं उत्तर ही त्यांच्या पक्षासाठी आणि इम्रान यांच्यासाठी एक चपराक आणि धडा आहे. ते कोणालाही आपला चेहरा देऊ शकत नाहीत. दाखवू शकणार नाहीत. त्यांना आता काळा चष्मा घालूनच फिरावं लागेल, असं अफनान उल्लाह खान यांनी म्हटलं आहे.

मारवत यांनी अफनान उल्लाह यांचा आरोप खोडून काढला आहे. अफनान जनतेची दिशाभूल करत आहेत. ते स्टुडिओतून पळून गेले आणि एका खोलीत लपले होते. त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा मारवत यांनी दिला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

विभाग

पुढील बातम्या