मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Draupadi Murmu : शेतकऱ्यांपासून चंद्रयानपर्यंत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणातील सात ठळक मुद्दे

Draupadi Murmu : शेतकऱ्यांपासून चंद्रयानपर्यंत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणातील सात ठळक मुद्दे

Aug 14, 2023, 11:05 PM IST

  • president draupadi murmu addressed the nation : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंख्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील जनतेला उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी जी-२० अध्यक्षता, महिला सशक्तीकरण, आदिवासी, शेतकरी व चंद्रयान आदि विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

president draupadi murmu

president draupadi murmu addressed the nation : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंख्येलाराष्ट्रपती द्रौपदी मुर्मूयांनी देशातील जनतेला उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी जी-२० अध्यक्षता, महिला सशक्तीकरण, आदिवासी, शेतकरी व चंद्रयान आदि विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

  • president draupadi murmu addressed the nation : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंख्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील जनतेला उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी जी-२० अध्यक्षता, महिला सशक्तीकरण, आदिवासी, शेतकरी व चंद्रयान आदि विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंख्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील जनतेला उद्देशून भाषण केले.  यावेळी त्यांनी शेतकऱ्यांपासून चंद्रयानापर्यंत आणि आदिवासींपासून महिला सशक्तीकरणापर्यंत सरकारकडून  सुरू असलेल्या योजनांचा उल्लेख केला. 

ट्रेंडिंग न्यूज

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

राष्ट्रपतींच्या भाषणातील ठळक मुद्दे -

 

1. आपल्या भाषणात राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले की, देशाने अनेक आव्हानांचे रुपांतर संधीत करत जीडीपी दरात वृद्धी नोंदवली आहे. अन्नदाता शेतकऱ्यांनी आर्थिक वृद्धिमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे. राष्ट्र त्यांचे ऋणी आहे.

2. आज महिला प्रत्येक क्षेत्रात सहभाग नोंदवत आहेत. काही वर्षापूर्वी कल्पनाही केली जात नव्हती अशा क्षेत्रात आज महिला पुढे आहेत. देशात महिला सशक्तीकरणावर जोर दिला जात आहे. महिलांचा विकास देशाच्या विकासाची संबधित आहे. 

३. मुर्मू यांनी म्हटले की, भारत संपूर्ण जगाचा विकास व सहकार्य वाढवण्यावर भर देत आहे. भारताने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अव्वलस्थान मिळवले असून जी-२० देशांच्या अध्यपदाची जबाबदारीही स्वीकारली आहे. जी-२० समूह जगातील दोन-तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते. 

४. राष्ट्रपतींनी म्हटले की, जी-२० च्या अध्यक्षतेच्या माध्यमातून बारताने व्यापार व आर्थिक क्षेत्रात प्रगती केली आहे.  याबरोबरच मानव विकास संबंधित मुद्द्यांवरही भारताने काम केले आहे. जे भौगोलिक सीमेशी बांधील नाहीत.

५.  भारतीय अंतराळ संशोधन संघटना नव नवीन झेप घेत आहे. ISRO ने चंद्रयान ३ लॉन्च केले असून ते चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आहे. चंद्रयान मोहीम अंतराल मोहिमांच्या आगामी कार्यक्रमाची केवळ सुरुवात आहे. आपल्याला अजून खूप पुढे जायचे आहे.

६. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले की, भारत प्राचीन काळापासून लोकशाहीची जननी आहे. देशात १९४७ साली नवीन पहाट झाली. त्यादिवशी आपण परदेशी सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवले. त्याचबरोबर आपल्या नियतीचे निर्माण करण्याचे स्वातंत्र्यही मिळवले.

७ – आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक योजना चालवल्या जात आहेत. मी आपल्या आदिवासी बंधू-भगिनींना आवाहन करते की, त्यांनी आपल्या परंपरांचे पालन करताना आधूनिकतेचाही स्वीकार करावा. 

पुढील बातम्या