मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  WhatsApp वर पाठवता येणार आता एचडी व्हिडिओ, 'या' टिप्स करा फॉलो

WhatsApp वर पाठवता येणार आता एचडी व्हिडिओ, 'या' टिप्स करा फॉलो

Aug 25, 2023, 03:55 PM IST

  • send HD Video on WhatsApp : व्हॉट्सअॅपच्या युझरसाठी आता आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सअॅपवर आता एचडी क्वालिटीचे व्हिडिओ पाठवता येणार आहे. या साठी खास फीचर व्हॉट्सअॅपने आणले आहे.

Whatsapp (REUTERS)

send HD Video on WhatsApp : व्हॉट्सअॅपच्या युझरसाठी आता आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सअॅपवर आता एचडी क्वालिटीचे व्हिडिओ पाठवता येणार आहे. या साठी खास फीचर व्हॉट्सअॅपने आणले आहे.

  • send HD Video on WhatsApp : व्हॉट्सअॅपच्या युझरसाठी आता आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सअॅपवर आता एचडी क्वालिटीचे व्हिडिओ पाठवता येणार आहे. या साठी खास फीचर व्हॉट्सअॅपने आणले आहे.

HD Video on WhatsApp : प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp मध्ये, आता नवीन फीचर आले आहे. याचा वापर करून वापरकर्ते एचडी व्हिडिओ पाठवू शकणार आहेत. येत्या काही आठवड्यांमध्ये, हे वैशिष्ट्यपूर्ण फीचर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपवर आता नवनवीन फीचर येत आहेत. या पूर्वी वापरकर्त्यांना एचडी व्हिडिओ पाठवता येत नव्हते. केवळ फोटो शेअर करता येत होते. मात्र, आता व्हिडिओ देखील शेअर करता येणार आहे. या नव्या फीचरमुळे व्हॉट्सअॅपवर फोटो किंवा व्हिडिओ पाठवल्यास त्याच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होत नाही. यूझर्स चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ पाठवता यावे या साठी नव्या फीचरची मागणी करत होते. त्यानुसार कंपनीने व्हॉट्सअॅपमध्ये एचडी व्हिडिओ पाठवण्याशी संबंधित एक नवीन फीचर आणले आहे.

bank holiday : सप्टेंबर महिन्यात तब्बल १६ दिवस राहणार बँका बंद; पाहा यादी

व्हॉट्सअॅप मेटाच्या मालकीचे आहे. या मेसेजिंग अॅपमध्ये एचडी व्हिडिओ शेअरिंगला सपोर्ट देण्यात आला आहे. या पुढे वापरकर्ते ७२० पिक्सल रिझोल्यूशनमध्ये फोटो पाठवू शकतात आणि डाऊनलोड करू शकणार आहेत. या सोबतच नवीन HD व्हिडिओ फीचर व्हॉट्सअॅपमध्ये येणार असून काही आठवड्यात ते सर्व अॅप यूझर्स साठी जागतिक स्तरावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे वैशिष्ट्य iOS, Android आणि वेबसाठी देखील वापरता येणार आहे. यामुळे आता उच्च दर्जाचे व्हिडिओ व्हॉट्सअॅपद्वारे शेअर करता येणार आहे.

devotees cheated god : घोर कलियुग… लोक देवालाही सोडत नाहीत, आंध्रातील मंदिरात काय घडलं पाहा!

या पद्धतीने पाठवा एचडी व्हिडिओ

- व्हॉट्सअॅपवर कोणताही व्हिडिओ HD गुणवत्तेत पाठवण्यासाठी, चॅट विंडो उघडा.

-व्हिडिओ कोणाला पाठवायचा आहे, त्याचे नाव सिलेक्ट करा

- यानंतर, मोबाइल मधील एचडी व्हिडिओ निवडा.

- यानंतर वरच्या बाजूला उजवीकडे दिसणार्‍या 'HD' बटण टॅप केल्यावर व्हिडिओ हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये संबंधित व्यक्तीला पाठवला जाईल.

- व्हिडिओ सेंड झाल्यावर ज्याला तो पाठवण्यात आला आहे, त्याला HD व्हिडिओ आल्याचे नॉटिफिकेशन दिसेल अशी देखील व्यवस्था नव्या फीचरमध्ये करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅपमध्ये यूझर बऱ्याच काळापासून एचडी व्हिडिओ शेअरिंग फीचरची मागणी करत होते. कारण आतापर्यंत व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ पाठवल्याने त्याची गुणवत्ता खराब होत होती. त्यामुळे मागणी नुसार हे फीचर आता देण्यात आले आहे.

नावाशिवाय whatsapp ग्रुप तयार करा

अलीकडे, व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना कोणतेही नाव किंवा विषय न सांगता व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्याचा पर्याय देण्यात दिला आहे. अशा ग्रुपमध्ये नावाऐवजी सदस्यांचे नाव किंवा संख्या दिसेल, जास्तीत जास्त ६ सदस्यांना नाव न देता tya ग्रुपचा सदस्य होता येणार आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी स्वतः या फीचरची माहिती दिली. येत्या काही आठवड्यांमध्ये यूजर्सना हे फीचर वापरता येणार आहे.

विभाग

पुढील बातम्या