मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Railway : वेटिंग लिस्टची झंझटच संपणार.. रेल्वेने बनवला असा प्लान की, सर्वांना मिळणार कन्फर्म तिकटी, जाणून घ्या कसे

Railway : वेटिंग लिस्टची झंझटच संपणार.. रेल्वेने बनवला असा प्लान की, सर्वांना मिळणार कन्फर्म तिकटी, जाणून घ्या कसे

Dec 16, 2023, 08:59 PM IST

  • Train Waiting Ticket : रेल्वेमधील वेटींग तिकिटींची समस्या संपवण्यासाठी रेल्वेने एक मेगा प्लान बनवला असून यासाठी १ लाख कोटी रुपयांची योजना आखली आहे.

Train Waiting Ticket

Train Waiting Ticket : रेल्वेमधील वेटींग तिकिटींची समस्या संपवण्यासाठी रेल्वेने एक मेगा प्लान बनवला असून यासाठी १ लाख कोटी रुपयांची योजना आखली आहे.

  • Train Waiting Ticket : रेल्वेमधील वेटींग तिकिटींची समस्या संपवण्यासाठी रेल्वेने एक मेगा प्लान बनवला असून यासाठी १ लाख कोटी रुपयांची योजना आखली आहे.

होळी-दिवाळी असेल किंवा छठ पूजा विशेष करून सणा-सुदीच्या काळात ट्रनमधून प्रवास करणे एक आव्हान असते. खचाखच भरलेल्या ट्रेनची तिकटी काही महिने आधीच फुल्ल झालेली असतात. लोकांना घर पोहोचण्यासाठी कन्फर्म तिकीट मिळत नाहीत. वेटिंग लिस्ट लांबच लांब होत जाते. वेटिंग तिकीटांची झंझट केवळ प्रवाशांसाठीच नाही तर रेल्वे व्यवस्थापनासाठीही डोकेदुखी ठरत आहे. मात्र आता वेटिंग तिकीटाची झंझट संपवण्यासाठी रेल्वेने नवीन योजना बनवली आहे. यासाठी रेल्वे १ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

रेल्वेची १ लाख कोटी रुपयांची योजना -

रेल्वेने सतत वाढणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या पाहून १ लाख कोटी रुपये किंमतीच्या नव्या ट्रेन अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्‍णव यांनी म्हटले की, वेटिंग लिस्टची झंझट संपवण्यासाठी भारतीय रेल्वे या मेगा प्लानवर काम करत आहे. या योजनेवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च अनुमानित आहे. या योजनेचा उद्देश्य वर्षानुवर्षे धावणाऱ्या जुन्या ट्रेन्सच्या स्टॉकला रिप्लेस करणे आहे. या योजनेच्या माध्यमातून रेल्वेच्या ताफ्यात ७  ते ८ हजार नव्या ट्रेन दाखल होणार आहेत. पुढच्या काही वर्षात जुन्या गाड्यांच्या जागी नव्या गाड्या धावू लागतील. यामुळे प्रवाशांना पुरेशा जागा उपलब्ध होतील.

कसे संपणार वेटिंग तिकिटांची झंझट -

ट्रेन्सची संख्या वाढल्यामुळे जागांची उपलब्धता वाढेल. ट्रेनची संख्या वाढल्यामुळे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल. सध्या प्रतिदिन २ कोटीहून अधिक लोक रेल्वेतून प्रवास करतात. त्याचबरोबर १०७५४ गाड्या धावतात. ट्रेनची संख्या वाढल्यामुळे फेऱ्यांची संख्या वाढेल. जर प्रतिदिन ३००० अतिरिक्त फेऱ्या केल्या तर वेटिंग तिकिटांची झंझटच संपणार आहे. प्रतिवर्षे ७०० कोटी लोक ट्रेनमधून प्रवास करतात. ही संख्या २०३० पर्यंत १००० कोटीपर्यंत पोहोचेल. प्रवाशांची संख्या वाढल्याबरोबरच ट्रेन्सची संख्या वाढवणे आवश्यक आहे. जर ट्रेन्सची संख्या ३० टक्के वाढवली तर रेल्वेमधील वेटिंग तिकिटांची झंझट संपेल.

पुढील बातम्या