मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pratik Doshi : अर्थमंत्री सीतारामन यांच्या मुलीनं बांधली लग्नगाठ; कोण आहेत सीतारामन यांचे जावई?

Pratik Doshi : अर्थमंत्री सीतारामन यांच्या मुलीनं बांधली लग्नगाठ; कोण आहेत सीतारामन यांचे जावई?

Jun 09, 2023, 10:28 AM IST

  • Who is Pratik Doshi : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची कन्या परकला वांगमयी हिचा विवाह गुरुवारी अत्यंंत साध्या पद्धतीनं झाला.

Nirmala Sitharaman

Who is Pratik Doshi : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची कन्या परकला वांगमयी हिचा विवाह गुरुवारी अत्यंंत साध्या पद्धतीनं झाला.

  • Who is Pratik Doshi : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची कन्या परकला वांगमयी हिचा विवाह गुरुवारी अत्यंंत साध्या पद्धतीनं झाला.

Who is Pratik Doshi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची कन्या परकला वांगमयी हिचा विवाह गुरुवारी प्रतीक दोशी यांच्याशी झाला. कर्नाटकात अत्यंत साध्या पद्धतीनं संत-महंतांच्या उपस्थिती विधीवत हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील किंवा अन्य कुठलेही व्हीआयपी पाहुणे उपस्थित नव्हते. उडुपी अदामरू मठाच्या संतांनी उपस्थित राहून वधुवरांना आशीर्वाद दिले.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

सीतारामन यांची कन्या परकला वांगमयी ही मिंट लाउंजच्या बुक्स अँड कल्चर सेक्सनमध्ये फीचर रायटर म्हणून कार्यरत आहे. हिंदू रितीरिवाजांनुसार तिनं प्रतीक दोशी यांच्याशी लग्नगाठ बांधली. कोणताही बडेजाव न करता किंवा मान्यवरांच्या आमंत्रणाशिवाय पार पडलेल्या या सोहळ्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सीतारामन यांचे जावई प्रतीक दोषी हे नेमके कोण आहेत याबद्दल लोकांना उत्सुकता आहे.

कोण आहेत प्रतीक दोशी?

  • प्रतीक दोशी हे मूळचे गुजरातचे आहेत. पंतप्रधान कार्यालयात ते ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (OSD) म्हणून काम करतात. नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर जून २०१९ मध्ये त्यांना संयुक्त सचिव पदावर बढती देण्यात आली.
  • दोशी हे सिंगापूर मॅनेजमेंट स्कूलचे पदवीधर आहेत. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयात (Gujarat CMO) संशोधन सहाय्यक म्हणून काम केलं आहे.
  • पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाइटनुसार, दोशी हे पीएमओच्या रिसर्च आणि स्ट्रॅटेजी विंगचे काम पाहतात.
  • पंतप्रधान मोदींचे डोळे आणि कान म्हणून ओळखले जाणारे दोशी हे नोकरशहा आणि सरकारमधील महत्त्वाच्या पदावर काम करणाऱ्या लोकांवर देखरेख करतात. नोकरशहांच्या नियुक्त्यांबाबत ते पंतप्रधान मोदींना आवश्यक माहिती आणि अभिप्राय देतात.
  • दोशी स्वतः खूप लो प्रोफाइल आहेत. ते कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय नाहीत.

IRCTC: रेल्वेचं तिकीट कॅन्सल करायचंय? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो, तुमचे पैसे वाचतील!

विभाग

पुढील बातम्या