मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  JN1 varient : कोरोनाच्या नव्या अवताराची जगभरात दहशत; सिंगापुरात ५६ हजार रुग्ण

JN1 varient : कोरोनाच्या नव्या अवताराची जगभरात दहशत; सिंगापुरात ५६ हजार रुग्ण

Dec 18, 2023, 05:35 PM IST

  • corona jn 1 variant : कोरोनाच्या नव्या अवतारानं आता जगभरात धुमाकूळ घातला असून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

Corona JN 1

corona jn 1 variant : कोरोनाच्या नव्या अवतारानं आता जगभरात धुमाकूळ घातला असून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

  • corona jn 1 variant : कोरोनाच्या नव्या अवतारानं आता जगभरात धुमाकूळ घातला असून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

Corona JN 1 variant : कोरोनाच्या महामारीचं दु:स्वप्न विसरण्याचा प्रयत्न जग करत असतानाच या महाभयंकर विषाणूच्या नव्या अवतारानं जगाची चिंता वाढवली आहे. जेएन १ (JN. 1) हा तो व्हेरिएंट असून सिंगापूरमध्ये तब्बल ५६ हजार लोकांना त्याची बाधा झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending news: रात्रीच्या वेळी झोपेतून आली जाग; पाणी समजून प्यायले ॲसिड, ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Trending news : प्रेमासाठी कायपण! महिला पोलीस निरीक्षक हवालदारासोबत गेली पळून, निवडणूक ड्युटीदरम्यान जुळले सूत!

Fact Check : रवींद्रनाथ टागोर यांचं छायाचित्र पंतप्रधान मोदींनी उलटं धरलं? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Fact Check : अखिलेश यादव यांच्यावर रोड शो दरम्यान बूट व चप्पला फेकल्या की हार अन् फुले?

सिंगापूरमध्ये दोन आठवड्यांत ५६ हजार रुग्ण आढळल्यानं तिथं पुन्हा एकदा मास्क घालण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. इतर देशांमध्येही कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा सर्वाधिक फटका अमेरिका आणि चीनमधील लोकांना बसत आहे. भारतात केरळमध्ये या व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला असून त्यामुळं चिंता वाढली आहे.

अधीर रंजन यांच्यासह लोकसभेतील ३३ खासदार निलंबित; आतापर्यंत ४७ सदस्य OUT, पाहा यादी

सिंगापूरमध्ये निर्बंध जारी

सिंगापूरमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य मंत्रालयानं लोकांसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. गर्दीची ठिकाणे टाळण्याचा तसंच, बाजारपेठा, विमानतळ व इतर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, चीनमध्ये सुमारे महिन्याभरात कोविड १९ जेएन.1 च्या सबव्हेरिएंटची सात प्रकरणे आढळली आहेत. अन्य ४० देशांमध्येही या व्हेरिएंटनं शिरकाव केला आहे.

अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

अमेरिकेत कोविड १९ च्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. एबीसी न्यूजच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत गेल्या चार आठवड्यांत (९ डिसेंबरपर्यंत) कोरोनामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांची संख्या २३,४३२ वर पोहोचली आहे. अमेरिकेत गेल्या महिन्याभरात कोरोनामुळं रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या २०० टक्क्यांनी तर फ्लूमुळं बाधित लोकांची संख्या ५१ टक्क्यांनी वाढली आहे. कोरोनाचा जेएन.१ व्हेरिएंट अमेरिका आणि चीनमध्ये वेगानं पसरत आहे.

Corona New Variant: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे केरळमध्ये २ जणांचा मृत्यू, अन्य राज्ये अलर्ट

भारतातही राज्य सरकारं सतर्क

केरळमध्ये कोरोना जेएन.१ चा नवा व्हेरियंट आल्यानं देशातील सर्व राज्यांनी आपली आरोग्य सुरक्षा वाढवली आहे. केरळमध्ये कोरोनाचा सर्वात घातक व्हेरियंट सापडला आहे. यातून धडा घेत कर्नाटक सरकारनं मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी सर्व ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजारांनी ग्रस्त लोकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.

विभाग

पुढील बातम्या