मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  COVID 19 JN1 : कोरोनानं टेन्शन वाढवलं! रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं होतेय वाढ

COVID 19 JN1 : कोरोनानं टेन्शन वाढवलं! रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं होतेय वाढ

Dec 22, 2023, 12:05 PM IST

    • Eknath Shinde On Coronavirus: कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेतली.kaण्
Corona JN 1

Eknath Shinde On Coronavirus: कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेतली.kaण्

    • Eknath Shinde On Coronavirus: कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेतली.kaण्

Coronavirus Updates: भारतातील नागरिकांना संकटात टाकणाऱ्या कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाचा नवा प्रकार जेएन १ ची आतापर्यंत एकूण २१ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पुनरागमनाची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली. महाराष्ट्राच्या सिंधुदुर्गात जेएन १ बाधित रुग्ण आढळून आला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेत त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : अखिलेश यादव यांच्यावर रोड शो दरम्यान बूट व चप्पला फेकल्या की हार अन् फुले?

Viral Video : मुक्या प्राण्यावर क्रूरता! पाळीव कुत्र्याला केअरटेकरची लिफ्टमध्ये बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

jackie shroff : माझ्या परवानगीशिवाय 'भिडू' शब्द वापरण्यास मनाई करा; जॅकी श्रॉफची हायकोर्टात धाव

Trending News : ऐकावं ते नवलच! नवऱ्यानं कुरकुऱ्याचा पुडा आणला नाही म्हणून बायकोचा घटस्फोटासाठी हट्ट

मुख्यमंत्र्यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेतली. "राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, राज्यभरातील यंत्रणा सज्ज आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. या बैठकीला आरोग्य मंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

देशात गुरुवारी ५९४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. याआधी बुधवारी ६१४ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. देशातील इतर काही राज्यांमध्येही कोविडची प्रकरणे आढळून आली आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांनी पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढवली आहे.

केरळमध्ये ३०० नवीन रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकात १३, तामिळनाडूमध्ये १२, गुजरातमध्ये ११, महाराष्ट्रात १०, तेलंगणात ५, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पुद्दुचेरीमध्ये प्रत्येकी दोन-दोन रुग्ण आढळले. आंध्र प्रदेश, आसाम, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळून आला आहे. कोरोनामुळे पंजाबमध्ये एक आणि कर्नाटकात दोघांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे गेल्या २४ तासांत कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात आतापर्यंत एकूण ५,३३,३२७ लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, बरे झालेल्या लोकांची संख्या ४,४४,७०, ५७६ झाली आहे. देशात बेर झालेल्या रुग्णांचा दर ९८.८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील एकूण कोविड रुग्णांची संख्या ४.५० कोटी (४,५०,०६,३३६) वर पोहोचली आहे. केरळमध्ये कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण १.१९ टक्के आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशात आतापर्यंत २२०.६७ कोटी कोरोना लस देण्यात आले आहेत. बुधवारी गोव्यात १९ रुग्ण आढळले. एनसीआरमधील गाझियाबाद, केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

विभाग

पुढील बातम्या