मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ICMR: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटबाबत अलर्ट; ४० पेक्षा अधिक वयोगटातील लोकांमध्ये मृत्यूचा धोका

ICMR: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटबाबत अलर्ट; ४० पेक्षा अधिक वयोगटातील लोकांमध्ये मृत्यूचा धोका

Aug 22, 2023, 04:06 PM IST

  • Corona New Variant: कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत आयसीएमआरने रिचर्स केला आहे.

coronavirus

Corona New Variant: कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत आयसीएमआरने रिचर्स केला आहे.

  • Corona New Variant: कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत आयसीएमआरने रिचर्स केला आहे.

Covid 19: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने संपूर्ण जगाचे टेन्शन वाढवले आहे. शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या एरिस आणि बीए. २.६८ या दोन व्हेरिएंट्सबाबत अर्लट केले आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, या प्रकारांचा संसर्ग होण्याचे प्रमाण खूप जास्त असल्याचे दिसून येत आहे. लसीकरण झालेल्या लोकांनाही हा व्हेरिएंटमुळे धोका उद्भवू शकतो. कोरोनाच्या हा नवीन व्हेरिएंट्स इम्युनिटीशी चांगल्याप्रकारे लढतो, असेही सांगितले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sushil Modi : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Hanooman AI : भारताचे पहिले स्वदेशी AI टूल ‘हनुमान’ लाँच, मोफत वापरण्याची जाणून घ्या ट्रिक

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी स्वाती मालिवाल यांना मारहाण, तक्रार दाखल

POK News : भारतात विलीन करा नाही तर स्वतंत्र करा! पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक पुन्हा रस्त्यावर

कोरोनाच्या कोणत्या प्रकारमुळे आरोग्याला धोके निर्माण होऊ शकतात हे शोधण्यासाठी इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने एक अभ्यास केला. इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्सच्या अहवालात म्हटले आहे की, ज्यांचे वय ४० पेक्षा जास्त आहे आणि त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच ज्यांना कॉमोरबिडीटी किंवा मध्यम ते गंभीर आजाराची लक्षणे दिसतात. अशा लोकांमध्ये कोरोनातून बरे झाल्यानंतर एका वर्षाच्या आत मृत्यू झाल्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोना संसर्गामुळे शरीरात अशा समस्या निर्माण होत असल्याचे आढळून आले आहे, ज्यामुळे गंभीर धोका उद्भवू शकतो, अगदी मृत्यू देखील होऊ शकतो.

कोरोनातून बरे झाल्यानंतर मृत्यू झालेल्या लोकांबाबत केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, ज्या लोकांनी कोरोनाचा एक डोस घेतला आणि त्यानंतर त्यांना संसर्ग झाला, अशा लोकांमध्ये मृत्युचा धोका कमी होता.अभ्यासात नमूद करण्यात आले आहे की, सादर केलेल्या विश्लेषणामध्ये केवळ कोविड-१९ मुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. संशोधकांना असे आढळून आले की, कोरोनाचे अनेक प्रकारामुळे गंभीर आजार किंवा मृत्युचा धोका वाढू शकतो.

सीडीसीने या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाच्या घटत्या प्रकरणांमध्ये संक्रमित लोकांच्या संख्येवर लक्ष ठेवणे थांबवले होते, कोरोनाच्या सद्यस्थितीची कल्पना येण्यासाठी रुग्णालयांचा डेटा विचारात घेतला जात आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक जॉन ब्राउनस्टीन म्हणतात की, आम्ही अजूनही कोरोनापासून उद्भवणाऱ्या धोक्याचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहोत. कोरोनाच्या वाढत्या प्रकाराकडे दुर्लक्ष करणे, घातक ठरू शकते.

विभाग

पुढील बातम्या