मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ram Manidr : अयोध्या राम मंदिरात नवी व्यवस्था! दररोज २०० भाविकांना मिळणार आरतीचा पास, असा करा अर्ज

Ram Manidr : अयोध्या राम मंदिरात नवी व्यवस्था! दररोज २०० भाविकांना मिळणार आरतीचा पास, असा करा अर्ज

Feb 16, 2024, 07:38 AM IST

    • Ram Mandir: अयोध्या राम मंदिरात नवीन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. आता पडदा न ओढता मंगल आरती करण्या येणार आहे. तसेच दररोज २०० लोकांना रामललाच्या आरतीमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. या साठी पास दिला जाणार आहे.
Ram mandir Pran Pratishtha

Ram Mandir: अयोध्या राम मंदिरात नवीन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. आता पडदा न ओढता मंगल आरती करण्या येणार आहे. तसेच दररोज २०० लोकांना रामललाच्या आरतीमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. या साठी पास दिला जाणार आहे.

    • Ram Mandir: अयोध्या राम मंदिरात नवीन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. आता पडदा न ओढता मंगल आरती करण्या येणार आहे. तसेच दररोज २०० लोकांना रामललाच्या आरतीमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. या साठी पास दिला जाणार आहे.

Ram Manidr : अयोध्येतील राम मंदिरात मोठा बदल करण्यात आला आहे. राम लल्लाच्या सकाळी जागरणानंतर होणारी मंगला आरती ही पडदा बाजूला करून करण्यात येणार आहे. ही परंपरा कोणत्याही वैष्णव मंदिरात अस्तित्वात नाही. श्री राम जन्मभूमीतही ६ डिसेंबर १९९२ पूर्वी आणि नंतर पडद्यामागे मंगला आरती करण्यात येत होती. मात्र, आत यात बदल करण्यात आला आहे. या सोबतच आरती दर्शन पासची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. १००-१०० जणांना मंगला आरती आणि दुपार नंतर होणाऱ्या आरतीचा पास दिला जाणार आहे. हा पास ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही उपलब्ध आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

shark in palghar : पालघर येथे तरुणाच्या पायाचा लचका तोडणाऱ्या मृत शार्क माशाच्या पोटातून निघाली तब्बल १५ पिल्लं

रामललाचे मुख्य आचार्य, आचार्य सत्येंद्र दास शास्त्री यांनी सांगितले की, सर्व वैष्णव मंदिरांमध्ये रामाचा दरबार आहे, ज्यामध्ये लक्ष्मणजी प्रभू रामाच्या सोबत आहेत आणि हनुमानजी माता सीतेसोबत आहेत. काही ठिकाणी माता सीता चार भावांसोबत तर काही ठिकाणी फक्त राम आणि सीता. माता सीतेच्या सोबत असल्यामुळे प्रतिष्ठेचे बंधन आहे. यामुळे, संपूर्ण शृंगार होईपर्यंत पडदा काढता येत नाही. याउलट श्रीरामाच्या जन्मभूमीत रामलला पाच वर्षांच्या बालकाच्या रूपात विराजमान आहे, या मंदिरात सीता माता नाही.

दिल्लीत अग्नितांडव! पेंट फॅक्टरीला भीषण आग, ७ जण होरपळून ठार, ३ जखमी

मुलाचे रूप नेहमीच साधे आणि मोहक असते. अयोध्या राम मंदिरात रामलला पूर्ण राजेशाही थाटात आहेत. ते नेहमी भक्तांना प्रसन्न करतात. भेट देणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात त्यांच्याबद्दल आपुलकी असते. अशा परिस्थितीत सजावट आणि शृंगाराचे कोणतेही बंधन नसते. त्यामुळेच तीर्थक्षेत्राने मंगला आरतीच्या दर्शनाची व्यवस्था केली आहे. पहाटे ४.३० वाजता सुप्रभातमधून जागरण झाल्यानंतर मंगला आरती केली जाते.

रामललाच्या मंगला आरतीची वेळ पहाटे साडेचार वाजता ठरलेली आहे. मंगला आरतीसाठी येणाऱ्या भविकांसाठी रिपोर्टिंग वेळ पहाटे ४ आहे. ४.१५ वाजेपर्यंत भाविकांना प्रवेश दिला जाईल. यानंतर पासधारक आल्यास त्यांना शृंगार आरती करता येणार आहे. या आरतीची वेळ सकाळी ६.३० वाजता निश्चित करण्यात आली आहे. या आरतीनंतर सात वाजल्यापासून सर्वसामान्य भाविकांचे नियमित दर्शन सुरू होते. मुख्य आचार्य श्री शास्त्री सांगतात की आचारसंहितेनुसार मंदिरात घालून दिलेले नियम पूर्ण करण्यासाठी पुजारी पहाटे तीन वाजता मंदिर उघडतात आणि संपूर्ण विधी पूर्ण करतात आणि नंतर रामललाला जागवतात. यानंतर प्रतिकात्मक गाईचे दर्शन व गज दर्शन केले जाते. पुन्हा तोंड धुण्यासोबत सुक्या मेव्याचा प्रसाद दिला जातो आणि मंगला आरती केली जाते. या आरतीनंतर शृंगार आरती नंतर पडदा झाकून, अभिषेक व पूजा करून, मूर्तीला सजवून, रबडी, पेडा व फळे अर्पण करून केली जाते.

शुक्रवारपासून रामललाच्या दर्शन कालावधीत बदल

रामललाच्या दर्शन काळात शुक्रवारपासून बदल लागू होऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनाचा कालावधी सकाळी ७ ते दुपारी १२.३० आणि पुन्हा दुपारी १.३० ते रात्री १० असा निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत दुपारी १२.३० ते १.३० पर्यंत दर्शन बंद राहणार आहे. या काळात रामलला विश्रांती घेतील.

विभाग

पुढील बातम्या