मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Agnipath Scheme: भारतीय लष्कराकडून अग्निवीरांची भरती सुरू, अशी आहे प्रक्रिया

Agnipath Scheme: भारतीय लष्कराकडून अग्निवीरांची भरती सुरू, अशी आहे प्रक्रिया

Jul 02, 2022, 01:10 PM IST

  • संरक्षण मंत्रालयाने (Defence Minister) शुक्रवारी ट्विटरवर (Tweet)सांगितले की, "भारतीय नौदलात अग्निवीरांची नोंदणी आजपासून सुरू होत आहे." "भारतीय सैन्यात सामील व्हा. अग्निवीर म्हणून देशाची सेवा करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. 

अग्निवीर योजना (हिंदुस्तान टाइम्स)

संरक्षण मंत्रालयाने (Defence Minister) शुक्रवारी ट्विटरवर (Tweet)सांगितले की, "भारतीय नौदलात अग्निवीरांची नोंदणी आजपासून सुरू होत आहे." "भारतीय सैन्यात सामील व्हा. अग्निवीर म्हणून देशाची सेवा करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा.

  • संरक्षण मंत्रालयाने (Defence Minister) शुक्रवारी ट्विटरवर (Tweet)सांगितले की, "भारतीय नौदलात अग्निवीरांची नोंदणी आजपासून सुरू होत आहे." "भारतीय सैन्यात सामील व्हा. अग्निवीर म्हणून देशाची सेवा करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. 

भारतीय लष्कर (Army) आणि नौदलाने (Navy) शुक्रवारी अग्निपथ योजनेंतर्गत (Agneepath Scheme) त्यांची भरती प्रक्रिया सुरू केली, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.भारतीय हवाई दलाने २४ जून रोजी या योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया सुरू केली होती आणि गुरुवारपर्यंत २ लाख ७२ हजार लाख अर्ज प्राप्त झाले होते, असे मंत्रालयाने सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

१४ जून रोजी या योजनेचे अनावरण झाल्यानंतर आणि विरोधी पक्षांनी ती मागे घेण्याची मागणी केल्यानंतर जवळपास आठवडाभर या योजनेच्या विरोधात हिंसक निदर्शने अनेक राज्यांमध्ये सुरु होती.

संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी ट्विटरवर सांगितले की, "भारतीय नौदलात अग्निवीरांची नोंदणी आजपासून सुरू होत आहे." "भारतीय सैन्यात सामील व्हा. अग्निवीर म्हणून देशाची सेवा करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. अग्निपथ भरती योजनेसाठी १ जुलैपासून नोंदणी सुरू होईल," असे त्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अग्निपथ योजनेंतर्गत, १७ ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांना चार वर्षांच्या कार्यकाळासाठी सशस्त्र दलात सामावून घेतले जाईल, तर त्यातील २५ टक्के तरुणांना नंतर नियमित सेवेत सामावून घेतले जाईल.

सरकारने १६ जून रोजी या वर्षासाठी अग्निवीर योजनेअंतर्गत भरतीची उच्च वयोमर्यादा २१ वरून २३ वर्षे केली होती आणि त्यानंतर केंद्रीय निमलष्करी दलांमध्ये अग्निवीरांना प्राधान्य देणे आणि त्यांच्यावरील संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यासारख्या अनेक गोष्टी जाहीर केल्या आहेत.

अनेक भाजपशासित राज्यांनी 'अग्निवीर',अग्निपथ योजनेंतर्गत सामील सैनिकांना राज्य पोलीस दलात समाविष्ट करण्यात प्राधान्य दिले जाईल असं म्हटलं आहे.

या भरती योजनेच्या विरोधात हिंसक निदर्शने आणि जाळपोळ करणाऱ्यांना अग्निवीर योजनेत सामील केले जाणार नाही, असे सशस्त्र दलाने दिलेल्या एका निवेदनात स्पष्ट केले आहे.

पुढील बातम्या