मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भारतीय नौदलाची मोठी कामगिरी, समुद्री चाच्यांच्या तावडीतून १५ भारतीयांना सुखरुप काढले बाहेर,Video

भारतीय नौदलाची मोठी कामगिरी, समुद्री चाच्यांच्या तावडीतून १५ भारतीयांना सुखरुप काढले बाहेर,Video

Jan 05, 2024, 10:51 PM IST

  • Indian Navy rescue operation : भारतीय नौदलाने आज धडाकेबाज मोहीम यशस्वी केली. सोमालिया जवळ अपहरण झालेल्या एमव्ही लीला नॉरफॉक जहाजातील सर्व १५ भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

Indian Navy rescue operation

Indian Navy rescue operation : भारतीय नौदलाने आज धडाकेबाज मोहीम यशस्वी केली. सोमालिया जवळ अपहरण झालेल्या एमव्ही लीला नॉरफॉक जहाजातील सर्व १५ भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

  • Indian Navy rescue operation : भारतीय नौदलाने आज धडाकेबाज मोहीम यशस्वी केली. सोमालिया जवळ अपहरण झालेल्या एमव्ही लीला नॉरफॉक जहाजातील सर्व १५ भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

सोमालियाजवळ हायजॅक झालेल्या जहाजाबाबात मोठी अपडेट समोर आली आहे. जहाजावरील सर्व भारतीय दल सुरक्षित आहेत आणि मरीन कमांडो मार्कोसचे ऑपरेशन सुरू आहे. 'एमव्ही लीला नॉरफॉक' नावाच्या या जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती गुरुवारी सायंकाळी मिळाली होती. सोमालिया किनाऱ्याजवळ अपहरण करण्यात आलेल्या या जहाजावर लायबेरिया देशाचा झेंडा होता. भारतीय नौसेनेचे विमान सतत नजर ठेऊन आहेत.

जहाजावरील सर्व २१ चालक दलातील लोकसुरक्षित –

ट्रेंडिंग न्यूज

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

उत्तर अरबी समुद्रात एमव्ही लीला नॉरफ़ॉक अपहरण झाल्यानंतर भारतीय नौदलाने तत्काळ कारवाई सुरू केली. जहाजातील सर्व २१ चालक दल (१५ भारतीय) ला सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. मार्को कंमांडोंनी संपूर्ण जहाजाची शोध मोहीम राबवली मात्र त्यात अपहरणकर्ते आढळले नाहीत. समुद्री चाच्यांनी जहाज अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जेव्हा नौदलाने युद्ध नौकेच्या माध्यमातून जहाज सोडवण्याचा इशारा दिल्यानंतर ते जहाज सोडून गेले.

 

१५ भारतीय लोक व अपहरण करण्यात आलेले जहाज एमव्ही लिली नॉरफॉकवरील सर्व चालक दल सुरक्षित आहेत. भारतीय नौदलाचे समुद्री कमांडो जहाजातील सर्व भाग सुरक्षित करत आहेत. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय नौदल प्रमुख एडमिरल आर हरि कुमार यांनी अरबी समुद्रात सक्रीय भारतीय युद्धनौकांनी निर्देश दिले आहेत की, जहार सोडवण्यासाठी समुद्री चाच्यांवर कडक कारवाई करावी. नौदलाने चार युद्ध नौका अरबी समुद्रात तैनात केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  मरीन कमांडो मार्कोस ऑपरेशनसाठी पोहोचले आहेत.भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस चेन्नई सोमालिया किनारी एमव्ही लीला नोरफॉकजवळ पोहोचले आहे. भारतीय युद्धनौकांनी आपले हेलीकॉप्टर उतरवले व समुद्री चोरांना जहाज सोडण्याचा इशारा दिला.

पुढील बातम्या