मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  National herald case : राहुल गांधींची ८ तास चौकशी, ईडीने उद्या पुन्हा बोलावलं!

National herald case : राहुल गांधींची ८ तास चौकशी, ईडीने उद्या पुन्हा बोलावलं!

Jun 13, 2022, 10:57 PM IST

    • नॅशनल हेराल्डप्रकरणी (National herald case) जवळपास साडेआठ तासांच्या चौकशीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कार्यालयाबाहेर पडले. त्यांची उद्या पुन्हा चौकशी होणार आहे.
राहुल गांधींची८तास ईडी चौकशी

नॅशनल हेराल्डप्रकरणी (National herald case) जवळपास साडेआठ तासांच्या चौकशीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कार्यालयाबाहेर पडले. त्यांची उद्या पुन्हा चौकशी होणार आहे.

    • नॅशनल हेराल्डप्रकरणी (National herald case) जवळपास साडेआठ तासांच्या चौकशीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कार्यालयाबाहेर पडले. त्यांची उद्या पुन्हा चौकशी होणार आहे.

नवी दिल्ली - नॅशनल हेराल्डप्रकरणी (National herald case) जवळपास साडेआठ तासांच्या चौकशीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कार्यालयाबाहेर पडले. ते तेथून थेट आपल्या घराकडे रवाना झाले. त्यानंतर आता पुन्हा उद्या मंगळवारी राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. राहुल गांधी यांना पुन्हा एकदा चौकशीला बोलावण्यात आल्यामुळे काँग्रेसचे नेते संतप्त झाले आहे. त्यामुळे उद्याही निदर्शनं करण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : चौथ्या मजल्यावर पडता पडला बचावला चिमुकला, तु काय करत होती? ट्रोलिंगला कंटाळून आईने संपवले आयुष्य

तेंदूच्या पानांची वाहतूक करणारे पिकअप वाहन दरीत कोसळले, १८ जणांचा मृत्यू; ४ जण जखमी

Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

Fact Check : प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड

तत्पूर्वी, सकाळी त्यांची सलग ३ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर दुपारी ३ च्या सुमारास जेवणाची सुटी झाली आणि राहुल थेट सर गंगाराम रुग्णालयात दाखल असलेल्या सोनिया गांधींना भेटायला गेले. त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही होत्या. सुमारे ४० मिनिटांनंतर राहुल गांधी ईडीच्या कार्यालयात परतले. त्यानंतर त्यांची जवळपास साडेपाच तास पुन्हा चौकशी करण्यात आली. या मॅरेथॉन चौकशीनंतर राहुल रात्री ९.१५ च्या सुमारास ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले.

आज राहुल गांधी (Rahul gandhi) ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी जाणार हे कळताच देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेल्याचे पाहायला मिळाले. देशभरात दिल्लीसह मुंबई आणि राज्याच्याही इतर भागामध्ये काँग्रेसनं आंदोलनं केली. तर ईडीच्या कार्यालयाबाहेरही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या धरल्याचं पाहायला मिळालं. इकडे मुंबईतही काँग्रेसचे महत्वाचे नेते, मंत्री, कार्यकर्ते सगळेच रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळाले.

काय आहे प्रकरण?

१९३८मध्ये काँग्रेस पक्षाने असोसिएट जर्नल्स लिमिटेड (AJL)ची स्थापना केली. या अंतर्गत नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र प्रकाशित करण्यात येऊ लागले. त्यावेळी एजेएलवर ९० कोटींहून अधिक कर्ज होते आणि ते दूर करण्यासाठी आणखी एक कंपनी स्थापन करण्यात आली होती. ज्याचे नाव यंग इंडिया लिमिटेड होते. यामध्ये राहुल आणि सोनियांचा वाटा ३८-३८% होता.

एजेएलचे ९ कोटी शेअर्स यंग इंडियाला देण्यात आले. या बदल्यात यंग इंडिया एजेएलचे दायित्व भरेल, असे सांगण्यात आले, परंतु जास्त भागीदारीमुळे यंग इंडियाला मालकी हक्क मिळाले. एजेएलच्या दायित्वांची पूर्तता करण्यासाठी काँग्रेसने दिलेले ९० कोटींचे कर्जही नंतर माफ करण्यात आले.

५५ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप -

२०१२ मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया आणि राहुल यांच्याविरोधात कोर्टात केस दाखल केली होती. यामध्ये स्वामींनी गांधी परिवारावर ५५ कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. मात्र, या प्रकरणात ईडीची एंट्री २०१५ मध्ये झाली.

विभाग

पुढील बातम्या