मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mutual Funds : म्युच्युअल फंडाच्या नियमात बदल, गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?

Mutual Funds : म्युच्युअल फंडाच्या नियमात बदल, गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?

Jul 02, 2022, 04:32 PM IST

    • म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या नियमात १ जुलैपासून बदल झाले आहेत. काय आहेत नवीन बदल व सामान्य गुंतवणूकदारांच्या पैशावर काय होणार परिणाम हे जाणून घेऊया..
म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या नियमात १ जुलैपासून बदल झाले आहेत. काय आहेत नवीन बदल व सामान्य गुंतवणूकदारांच्या पैशावर काय होणार परिणाम हे जाणून घेऊया..

    • म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या नियमात १ जुलैपासून बदल झाले आहेत. काय आहेत नवीन बदल व सामान्य गुंतवणूकदारांच्या पैशावर काय होणार परिणाम हे जाणून घेऊया..

Mutual Funds Investment Rules Changed :  म्युच्युअल फंडात आपण जी गुंतवणूक करत होतो, ती थेट आपल्या बँक खात्यातून कापली जात होती. परंतु १ जुलैपासून म्युच्युअल फंड व्यवहारांसाठी स्टॉक ब्रोकर्सद्वारे कोणत्याही स्वरूपात किंवा पद्धतीने निधी किंवा युनिट्सचे पूलिंग बंद केले जाईल. म्युच्युअल फंड गुंतवणूक १ जुलैपासून पूल खात्यातून सुरू करता येणार नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) आदेशानुसार गुंतवणूकदाराच्या बँक खात्यातून पैसे म्युच्युअल फंड हाऊसच्या बँक खात्यात वर्ग करावे लागतील. कारण स्टॉक एक्स्चेंजद्वारे समर्थित सर्व व्यवहार प्लॅटफॉर्म याची अंमलबजावणी करतील.

गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?

नवीन नियमांनुसार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांचे ट्रेडिंग खाते यापुढे वापरले जाणार नाही. पैसे गुंतवणूकदाराच्या बँक खात्यातून थेट फंड हाऊसच्या बँक खात्यात जातील. त्यामुळे तुम्हाला म्युच्युअल फंड (एमएफ) खरेदी करायचा असेल तर थेट बँक खात्यातून एएमसीला पैसे द्यावे लागतील. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडाची पूर्तता केल्यानंतर गुंतवणूकदाराच्या डीमॅट खात्याशी जोडलेल्या बँक खात्यात क्रेडिट जमा केले जाईल. याशिवाय गुंतवणूकदारांना सर्व सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्ससाठी (SIPs) थेट त्यांच्या बँक खात्यातून एक आदेश सेट करणे आवश्यक आहे. कारण प्लॅटफॉर्मला सर्व SIP साठी गुंतवणूकीच्या AMC SIP मोडमध्ये जावे लागेल. विशेष म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये SEBI ने एक परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार १ एप्रिल २०२२ पासून म्युच्युअल फंडासाठी निधी एकत्र करण्यास परवानगी ​​​​नाही. परंतु नंतर ही मुदत १ जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती.

 

विभाग

पुढील बातम्या