मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mukesh Ambani : मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक, तपास सुरू

Mukesh Ambani : मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक, तपास सुरू

Nov 04, 2023, 03:36 PM IST

    • Mukesh Ambani Death Threat : रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
Mukesh Ambani Death Threat (REUTERS)

Mukesh Ambani Death Threat : रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

    • Mukesh Ambani Death Threat : रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Mukesh Ambani Death Threat : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने एकमागून अनेक ई-मेल करत खंडणीची मागणी अंबानींकडे केली आहे. गणेश रमेश वानपाधरी असं आरोपीचं नाव असून त्याला मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. मुकेश अंबानी यांना धमकी देणारा आरोपी हा तेलंगणातील असून पोलिसांनी त्याला तेलंगणातून ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं मुंबईत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीवर खंडणी आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

मिळालेल्या माहितीनुसार, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कार्यालयाच्या ई-मेलवर गणेश रमेश वानपाधरी या आरोपीने अनेकदा खंडणीचे मेल केले आहे. ई-मेलला उत्तर मिळत नसल्याने आरोपीने २०० कोटी रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. त्यानंतर मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी देखील आरोपीने दिली. त्यानंतर या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत तातडीने आरोपीवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला तेलंगणातून अटक केली असून त्याची कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास सुरू करण्यात आला आहे.

रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईतील बीकेसीत जिओ वर्ल्ड मॉलचं उद्घाटन केलं होतं. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी कार्यक्रमात हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर लगेचच त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळं खळबळ उडाली आहे. आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर कडक सुरक्षा तैनात केली आहे. याशिवाय आरोपीची चौकशी करण्यात येत असून या प्रकरणात आणखी काही लोकांचा हात आहे का?, याचाही तपास केला जात आहे.

पुढील बातम्या