मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Petrol-Diesel Prices : सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार; पेट्रोल-डिझेलच्या किंमती १० रुपयांनी होणार कमी!

Petrol-Diesel Prices : सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार; पेट्रोल-डिझेलच्या किंमती १० रुपयांनी होणार कमी!

Dec 28, 2023, 10:30 PM IST

  • Petrol-Diesel Price Reduce : केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये लवकरच मोठ्या कपातीची घोषणा करु शकते. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये ६ ते १० रुपयांची कपात केली जाऊ शकते.

Petrol-Diesel Price Reduce

Petrol-Diesel PriceReduce : केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये लवकरच मोठ्या कपातीची घोषणा करु शकते. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये ६ ते १० रुपयांची कपात केली जाऊ शकते.

  • Petrol-Diesel Price Reduce : केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये लवकरच मोठ्या कपातीची घोषणा करु शकते. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये ६ ते १० रुपयांची कपात केली जाऊ शकते.

पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार जनतेला खुश करण्यासाठी अनेक लोकप्रिय घोषणा करण्याच्या प्रयत्नात आहेत. आता देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईपासून मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल  (Petrol-Diesel) च्या किंमतीमध्ये लवकरच मोठ्या कपातीची  घोषणा करु शकते. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये (Petrol-Diesel Price Reduce) ६ ते १० रुपयांची कपात केली जाऊ शकते. याबाबत केंद्र सरकार तेल कंपन्यांसोबत चर्चा करत आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

मे २०२२ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर अनेक महिन्यांपासून स्थिर आहेत. केंद्र सरकारने मागच्या वेळी उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलच्या एकूण किंमतीत १३ ते १६ रुपयांची कपात झाली होती. 

अनेक महिन्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याबाबत पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय चर्चा करत आहेत. याशिवाय तेल कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर ६ ते १० रुपयांनी स्वस्त होऊ शकतात.

मागील काही महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत (Crude oil) घट झाली आहे. सध्या कच्च्या तेलाचे भाव ८० डॉलर प्रति बॅरल आहे. यामुळे भारतीय तेल कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. आता आशा आहे की, देशातील जनतेला महागाईपासून थोडा दिलासा मिळेल.

तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ किंवा कमी करत असतात. देशात तेलाच्या किंमती दरदिवशी ठरवल्या जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालय आणि पेट्रोलियम मंत्रालयाने तेलाच्या किमती कमी करण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केली असून यासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या मंजुरी मिळावी म्हणून प्रतीक्षा केली जात आहे. 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) वेबसाइट iocl.com नुसार, पेट्रोल आणि डिझेलचे दर दिल्ली ते कोलकाता पर्यंत स्थिर आहेत. आज दिल्लीत पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आणि डिझेलची  ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०६.३१ रुपये तर डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. 

विभाग

पुढील बातम्या