मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Manipur Violence : मणीपुर येथे आंदोलकांचा थेट मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर हल्ला; सुरक्षा रक्षकांचा गोळीबार

Manipur Violence : मणीपुर येथे आंदोलकांचा थेट मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर हल्ला; सुरक्षा रक्षकांचा गोळीबार

Sep 29, 2023, 06:52 AM IST

    • Mob attack on manipur cm biren singh house: मणीपुर येथील परिस्थिती चिघळली आहे. ५०० ते ६०० आंदोलकांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या वेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर गोळीबाळ करून अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या.
Mob attack on manipur cm biren singh house

Mob attack on manipur cm biren singh house: मणीपुर येथील परिस्थिती चिघळली आहे. ५०० ते ६०० आंदोलकांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या वेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर गोळीबाळ करून अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या.

    • Mob attack on manipur cm biren singh house: मणीपुर येथील परिस्थिती चिघळली आहे. ५०० ते ६०० आंदोलकांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या वेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर गोळीबाळ करून अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या.

इम्फाळ: मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार सुरू असून तो अद्याप शमला नाही आहे. या घटनेमुळे मणिपूर अशांत क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, एका ५०० ते ५०० च्या गटाने गुरुवारी सायंकाळी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या इंफाळ पूर्वेतील हेनगांग येथील वडिलोपार्जित घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी १०० मीटर अंतरावरच जमावाला रोखले.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

Nashik Ganesh Visarjan : नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीला गालबोट.. तीन घटनांमध्ये पाच तरुण बुडाले

जमावाला पांगवण्यासाठी आरएएफ आणि राज्य पोलीस कर्मचाऱ्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यानंतर परिसरातील वीज सेवा खंडीत करण्यात आली होती. घराजवळील बॅरिकेड्स वाढवण्यात आल्या आहेत, असं वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

मुख्यमंत्री बिरेन सध्या या घरात राहत नाहीत. ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी राहतात. इम्फाळमधील हिंगांग भागात मुख्यमंत्र्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Excess salt consumption: जास्त मीठ खाताय? होऊ शकते शरीराचे नुकसान!

मणिपूरमधील दोन तरुणांच्या मृत्यूप्रकरणी मंगळवारी आणि बुधवारी विद्यार्थ्यांनी हिंसक निदर्शने करण्यात आली. जमावाने गुरुवारी पहाटे इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील उपायुक्त कार्यालयाची तोडफोड केली. तर दोन चारचाकी गाड्या पेटवून दिल्या. राज्यातील मेईतेईचे वर्चस्व असलेल्या खोऱ्यात हिंसाचार शिगेला पोहोचला आहे.

दोन फोटो व्हायरल झाल्यानंतर आंदोलकांचा भडका उडाला. हे फोटो दोन Meitei तरुणांचे आहेत, जे ६ जुलैपासून बेपत्ता झाले होते. त्यांना दहशतवाद्यांनी मारले होते. हिजाम लिंथोइंगमी (वय १७) आणि फिजाम हेमजीत (वय २०) अशी मृतांची नावे आहेत. बुधवारीही आंदोलक विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचा बंगला आणि राजभवनाकडे मोर्चा वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

विद्यार्थी प्रतिनिधींना राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर दुपारी थौबल जिल्ह्यातील भाजप खोंगजोम विभागीय कार्यालयाला जमावाने आग लावली. मणिपूरच्या २० हून अधिक आमदारांनी केंद्राकडे दोन विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची विनंती केली. आमदाराने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सीबीआय तपास जलद करण्याची विनंती केली आहे.

विभाग

पुढील बातम्या