मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mohali Video Case : पंजाबच्या विद्यार्थीनींचे MMS मुंबईत व्हायरल; पोलिसांकडून आरोपीला अटक

Mohali Video Case : पंजाबच्या विद्यार्थीनींचे MMS मुंबईत व्हायरल; पोलिसांकडून आरोपीला अटक

Sep 20, 2022, 02:58 PM IST

    • Mohali MMS Video Case : काही दिवसांपूर्वी मोहालीतील चंदीगड विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या ६० मुलींचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर आता या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईत आणि गुजरातमध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Mohali viral video case (HT)

Mohali MMS Video Case : काही दिवसांपूर्वी मोहालीतील चंदीगड विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या ६० मुलींचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर आता या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईत आणि गुजरातमध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    • Mohali MMS Video Case : काही दिवसांपूर्वी मोहालीतील चंदीगड विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या ६० मुलींचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर आता या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईत आणि गुजरातमध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mohali viral video case : काही दिवसांपूर्वी पंजाबच्या मोहालीतील चंदीगड विद्यापीठातील तब्बल ६० मुलींचे अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं देशभरात खळबळ उडाली होती. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका मुलीनं हे व्हिडिओ शूट केले होते, अशी माहिती समोर आल्यानंतर आता पोलिसांनी आरोपी विद्यार्थीनीला अटक केली आहे. परंतु आता या घटनेचे व्हिडिओ मुंबईतही व्हायरल होत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुलं आता आरोपी विद्यार्थीनीनं हे व्हिडिओ केवळ तिचा बॉयफ्रेंड सनीला शिमल्यातच नाही तर मुंबईतही पाठवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बर्ड फ्लूचे संकट! केरळनंतर उत्तराखंडमध्ये अलर्ट जारी, प्रत्येक जिल्ह्यातील पक्षांचे नमुने तपासणार

ट्रकच्या धडकेत नोटांच्या बंडलांनी भरलेला 'छोटा हत्ती' पलटला, रस्त्यावर पसरले ७ कोटींची रक्कम

Narendra Modi : भरसभेत पंतप्रधान मोदी ‘या’ महिलेच्या पाया पडले, कोण आहे ही ८० वर्षीय वृद्ध महिला

धक्कादायक.. लग्न मोडल्याने भडकला नवरदेव, वधूचे शीर धडावेगळे करून सोबत नेले

मिळालेल्या माहितीनुसार, मोहाली न्यूड व्हिडिओ केसमध्ये आता मुंबईचं नाव समोर आलं आहे. कारण आता मुंबईत त्या ६० मुलींचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी मोहित नावाच्या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांना त्याच्या मोबाईमध्ये काही संशयास्पद स्क्रीनशॉटही मिळाले असून आरोपी विद्यार्थीनी त्याच्या संपर्कात नसतानाही त्याला हे व्हिडिओ मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी विद्यार्थीनीनं तिच्या बॉयफ्रेंडला जे व्हिडिओ पाठवले होते, त्यानंच मलाही सर्व अश्लिल व्हिडिओ पाठवल्याची कबुली आरोपी मोहितनं पोलिसांना दिली आहे. त्यामुळं आता पोलीस आरोपी सनी आणि मोहित या दोघांना समोरासमोर घेऊन चौकशी करण्याची शक्यता आहे. याशिवाय आरोपींकडून जप्त करण्यात आलेले चार मोबाईल पोलिसांनी फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवले आहेत. त्याचबरोबर शहरातील ज्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून हे व्हिडिओ शेयर करण्यात आले होते, त्या ग्रुप्सचा आणि ॲडमिनचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

याशिवाय हिमाचल प्रदेशातून अटक करण्यात आलेल्या आरोपी सनीला मुंबई आणि गुजरातमधून अनेक कॉल्स आलेले आहेत. त्यामुळं आता या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्र आणि गुजरातपर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील बातम्या