मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Naxalite movement : जहाल नक्षलवादी व पश्चिम घाटचा कमांडर संजय रावला अटक

Naxalite movement : जहाल नक्षलवादी व पश्चिम घाटचा कमांडर संजय रावला अटक

Sep 14, 2023, 11:32 PM IST

  • Naxalite leader Sanjay rao : माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा केंद्रीय समितीचा सदस्य आणि जहाल नक्षलवादी कमांडर संजय राव उर्फ विजय राव याला अटक करण्यात आली आहे.

Naxalite

Naxalite leader Sanjay rao : माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा केंद्रीय समितीचा सदस्य आणि जहाल नक्षलवादी कमांडर संजय राव उर्फ विजय राव याला अटक करण्यात आली आहे.

  • Naxalite leader Sanjay rao : माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा केंद्रीय समितीचा सदस्य आणि जहाल नक्षलवादी कमांडर संजय राव उर्फ विजय राव याला अटक करण्यात आली आहे.

नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा केंद्रीय समितीचा सदस्य आणि जहाल नक्षलवादी कमांडर संजय राव उर्फ विजय राव याला अटक करण्यात आली आहे. संजयला हैदराबादमधून अटक करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून माओवादी चळवळीला अनेक धक्के बसत आहेत. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून माओवाद्यांची कोंडी करण्याचे काम सुरू आहे. त्याचा परिणाम माओवादी चळवळीवर होत आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

तेंदूच्या पानांची वाहतूक करणारे पिकअप वाहन दरीत कोसळले, १८ जणांचा मृत्यू; ४ जण जखमी

Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

Fact Check : प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड

Ebrahim raisi : इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू! १७ तासानंतर सापडले हेलिकॉप्टर

अटक करण्यात आलेला संजय मूळचा महाराष्ट्रातील अंबरनाथचा रहिवाशी  आहे. मागील अनेक वर्ष तो नक्षलवादी कार्यवायांमध्ये सक्रिय सदस्य राहिला आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून संजय राव याच्याकडे पश्चिम घाट विभागाचा कमांडर म्हणून जबाबदारी दिली होती. पश्चिम घाटाचा कमांडर म्हणून तो कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू मधील नक्षली कारवायांमध्ये सक्रीय होता. त्याचबरोबर संजय माओवादी पक्ष संघटनेत महत्त्वाच्या पदावर म्हणजेच केंद्रीय समितीचा सदस्य होता. 

दोन महिन्यापूर्वी जहाल नक्षलवादी व महाराष्ट्र – मध्यप्रदेश राज्यात नक्षलवादी कारवायांची जबाबदारी सांभाळणारा मिलिंद तेलतुंबडे पोलीस चकमकीत ठार झाला होता. त्यानंतर संजय रावकडे एमएमसी झोनची जबाबदारी दिली जाणार होती. मात्र त्यापूर्वीच तेलंगणा पोलिसांनी हैदराबादमध्ये संजय राव याला अटक केली.

विभाग

पुढील बातम्या