मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मणिपूरमधील हिंसाचार थांबणार? राज्यातील सर्वात जुन्या मैतेई बंडखोर गटाने शस्त्रे टाकली, अमित शहांची माहिती

मणिपूरमधील हिंसाचार थांबणार? राज्यातील सर्वात जुन्या मैतेई बंडखोर गटाने शस्त्रे टाकली, अमित शहांची माहिती

Nov 29, 2023, 09:40 PM IST

  • Manipur Violence : मणिपूरमधील बंडखोरांचा सर्वात जुना सशस्त्र गट युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटने (यूएनएलएफ) हिंसेचा मार्ग सोडत मुख्यधारेत येण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेने आपली शस्त्रं टाकत शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे.

UNLF Signs Peace Agreement

Manipur Violence : मणिपूरमधील बंडखोरांचा सर्वात जुना सशस्त्र गट युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटने (यूएनएलएफ) हिंसेचा मार्ग सोडत मुख्यधारेत येण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेने आपली शस्त्रं टाकत शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे.

  • Manipur Violence : मणिपूरमधील बंडखोरांचा सर्वात जुना सशस्त्र गट युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटने (यूएनएलएफ) हिंसेचा मार्ग सोडत मुख्यधारेत येण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेने आपली शस्त्रं टाकत शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे.

UNLF Signs Peace Agreement : मागील अनेक महिन्यांपासून मणिपूर हिसेंच्या आगीत होरपळत आहे. देशभरात चिंतेचा विषय ठरलेला मणिपूरचाहिंसाचार अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. मणिपूरमधील सर्वात जुना सशस्त्र गट, यूएनएलएफने (UNLF) हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे मान्य केले आहे. तसेच, UNLF ने शांतता करारावरही स्वाक्षरी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी (२९ नोव्हेंबर) ही माहिती दिली.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

मणिपूरमधील बंडखोरांचा सर्वात जुना सशस्त्र गट युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटने (यूएनएलएफ) हिंसेचा मार्ग सोडत मुख्यधारेत येण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेने आपली शस्त्रं टाकत शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे

गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे की, मणिपूर खोऱ्यातील सर्वात जुना सशस्त्र गट यूएनएलएफने हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. लोकशाही प्रक्रियेत परतल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. शांतता आणि प्रगतीच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो.

मोदी सरकारच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं आहे. आपण हा एक ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. यूएनएलएफने आज नवी दिल्लीत शांतता करारावर स्वाक्षरी केल्यामुळे ईशान्येत कायम स्वरुपी शांतता प्रस्थापित करता येणार आहे.

अमित शाह यांनी आणखी एका एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, भारत सरकार आणि मणिपूर राज्य सरकारने यूएनएलएफबरोबर शांतता करार पूर्ण केला आहे. हा शांतता कर गेल्या सहा दशकांपासून चालत आलेल्या सशस्त्र आंदोलनाच्या अंताचं आणि नव्या आरंभाचं प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्वसमावेशक धोरण,सर्वांना बरोबर घेऊन विकास करण्याचा दृष्टीकोन आणि ईशान्य भारतातील तरुणांना उत्तम भविष्य प्रदान करण्याच्या दिशेने उघडलेल्या मोहिमेतलं हे मोठं यश आहे.

विभाग

पुढील बातम्या