मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Air India : एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचं घाणेरडं कृत्य; असं काही केलं की सहप्रवासी झाले हैराण

Air India : एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचं घाणेरडं कृत्य; असं काही केलं की सहप्रवासी झाले हैराण

Jun 27, 2023, 11:54 AM IST

  • Defecates Urinates and Spits on Air India flight : विमानात प्रवाशांचे गैरकृत्य करण्याचे. प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. असाच एक घाणेरडा प्रकार मुंबईहून दिल्ली येथे जाणाऱ्या एका विमानात घडला आहे.

air india HT

Defecates Urinates and Spits on Air India flight : विमानात प्रवाशांचे गैरकृत्य करण्याचे. प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. असाच एक घाणेरडा प्रकार मुंबईहून दिल्ली येथे जाणाऱ्या एका विमानात घडला आहे.

  • Defecates Urinates and Spits on Air India flight : विमानात प्रवाशांचे गैरकृत्य करण्याचे. प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. असाच एक घाणेरडा प्रकार मुंबईहून दिल्ली येथे जाणाऱ्या एका विमानात घडला आहे.

Man Defecates Urinates on flight :आज काल विमानात प्रवाशांच्या गैरकृत्यात मोठी वाढ झाली आहे. काही दिसांपूर्वीच एका महिलेवर प्रवाशाने लघवी केली होती. यानंतरही अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. दरम्यान मुंबईहून दिल्ली येथे जाणाऱ्या एका विमानात एक घाणेरडी घटना घडली आहे. एअर इंडियाच्या AIC866 या विमानात एका प्रवाशाने चक्क विमानात लघवी केली यानंतर त्याने भर विमानातच शौच देखील केला. एवढेच नाही तर भर विमानातही हा प्रवाशी सर्वांसमोर थुंकला. यावेळी विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्सने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने न ऐकता त्याचे घाणेरडे कृत्य हे सुरच ठेवले होते. हे या प्रवाशाला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे.ही घटना २४ जून रोजी घडली.

ट्रेंडिंग न्यूज

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

पोलिसांनी दिलेल्या माहिती लनुसर राम सिंह असे या प्रवाशाचे नाव असून त्याला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे. मुंबई येथून एअर इंडियाची AIC866 ही प्लाईट दिल्ली येथे जात होती. या फ्लाईटमधून आरोपी राम सिंह हा देखील जात होता.आरोपी हा आफ्रिकेत स्वयंपाकी म्हणून काम करतो. प्रवास दरम्यान आरोपी राम सिंह याने विमानात भर प्रवाशांसमोर आणि विमानातील क्रू मेंबर पुढे लघवी केली. येवढेच नाही तर विमानात शौचास देखील बसला. दरम्यान तो फ्लाईटमध्ये थुंकत देखील होता. विमानाच्या केबिन क्रूने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मानला नाही, दरम्यान ही घटना क्रु मेंबर्सनी वैमानिक कॅप्टन वरुण संसारे यांना घटनेची माहिती दिली. याची माहिती तातडीने एअर इंडियाला पाठवण्यात आली. विमान दिल्ली विमानतळावर उतरताच त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विमानातील इतर प्रवाशांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. कॅप्टन वरुण संसारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एअर इंडियाच्या विमानात या पूर्वी देखील प्रवाशांचे गैरकृत्य समोर आले आहेत. प्रवाशाने महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याची घटना याआधी समोर आली होती. गेल्या वर्षी 6 डिसेंबर रोजी एअर इंडियाच्या फ्लाईट नंबर १४२ मध्ये पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये एका पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी केली होती.

विभाग

पुढील बातम्या