मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  President Election 2022 : ममता दिदींनी घेतली शरद पवारांची भेट

President Election 2022 : ममता दिदींनी घेतली शरद पवारांची भेट

Jun 14, 2022, 06:19 PM IST

    • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी शरद पवारांची भेट घेतली.
शरद पवार आणि ममता बॅनर्जी (हिंदुस्तान टाइम्स)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी शरद पवारांची भेट घेतली.

    • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी शरद पवारांची भेट घेतली.

१८ जुलै रोजी होणाऱ्या देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या (President) निवडणुकीसाठी बिगर भाजप (Non BJP) नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाला पसंती आहे. असं असतानाच आता तृणमुल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी (Mamta Banerjee) आज शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत उद्या होणाऱ्या भाजपेतर पक्षांच्या बैठकीबाबतही चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

त्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण या निवडणुकीसाठी फारसे उत्सूक नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र भाजपकडेही राजकारणातला इतका जेष्ठ व्यक्ती नाही असं सांगत पवारांटची सध्या मनधरणी करण्याचे प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत. ममता बॅनर्जी यांनी आज शरद पवारांची घेतलेली भेट हेच सांगून जात आहे.

बुधवारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये तृणमुलच्या वतीनं एका भाजपेतर नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेत देशातल्या २२ भाजपेतर पक्षाच्या नेत्यांना या बैठकीत आमंत्रित केलं आहे. या बैठकीसाठी ममता बॅनर्जी फारच आशावादी असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज ममता बॅनर्जी यांनी घेतलेली शरद पवारांची भेट महत्वाची मानली जात आहे.

या आधीही शरद पवारांची अनेक मान्यवरांनी घेतली होती भेट

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार मल्लीकार्जुन खरगे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. या भेटीनंतर राष्ट्रपती निवडणुकीबाबत आम्ही प्राथमिक चर्चा केली, असे खरगे आणि पवार यांनी सांगितले होते. मात्र, गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता शरद पवार हे भाजपविरोधी आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, अशी दाट शक्यता आहे.आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनीही याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांची नकतीच त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. आपचे खासदार संजय सिंह आणि शरद पवार यांच्यात याविषयी चर्चाही झाली आहे. आगामी १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल आणि २१ जुलैला या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत शरद पवार हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरणार की नाही, हे स्पष्ट होईल.

पुढील बातम्या