मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  India Alliance Meeting : ३ राज्यात पराभव होताच INDIA आघाडीत बिघाडी? बैठकीकडे ममता बॅनर्जींनी फिरवली पाठ!

India Alliance Meeting : ३ राज्यात पराभव होताच INDIA आघाडीत बिघाडी? बैठकीकडे ममता बॅनर्जींनी फिरवली पाठ!

Dec 04, 2023, 10:26 PM IST

  • Mamata Banerjee on INDIA Meeting : इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ६ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीबाबत मला काहीच माहीत नाही. त्या दिवशी माझे राज्यात अनेक नियोजित कार्यक्रम आहेत.

Mamata Banerjee

Mamata Banerjee on INDIA Meeting : इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ६ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीबाबत मला काहीच माहीत नाही. त्या दिवशी माझे राज्यात अनेक नियोजित कार्यक्रम आहेत.

  • Mamata Banerjee on INDIA Meeting : इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ६ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीबाबत मला काहीच माहीत नाही. त्या दिवशी माझे राज्यात अनेक नियोजित कार्यक्रम आहेत.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दिमाखदार विजयाने विरोधकांच्या INDIAआघाडीत बिघाडी निर्माण केली आहे. आघाडीची ६ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या नेतृत्वात बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र या बैठकीत उपस्थित राहण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी नकार दिला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, हा पराभव जनतेचा नाही तर काँग्रेसचा आहे. काँग्रेसची रणनीती योग्य नव्हती. काँग्रेसने जागा वाटपाबाबत बोलणी केली नाही, याचा परिणाम दारुण पराभवात झाला. त्यांनी म्हटले की, इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. यानंतर चर्चा केल्या जात आहेत की, कदाचित ममता बनर्जी मीटिंगमध्ये उपस्थित राहणार नाहीत.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: राहुल गांधी फेसबूक, इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना दरवर्षी एक लाख रुपये देणार? वाचा

Afghanistan floods: अफगाणिस्तानमध्ये पावसाचा कहर, पुरात ३०० हून अधिक जणांचा मृत्यू

Attack on Israel : राफावर हल्ल्याआधी इस्लामिक संघटनेने इस्रायलवर डागले क्षेपणास्त्र; युद्ध आणखी भडकणार

Viral news: हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या जेवणात मिसळत होता प्रायव्हेट पार्ट अन् करत होता लघवी! वेटरचे घाणेरडे कृत्य

भाजपविरोधी पक्षीय इंडिया आघाडीच्या नेत्यांची बुधवारी ६ डिसेंबर रोजी बैठक होणार आहे. मात्र, या बैठकीबाबत कोणतीही माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीकडे ममता बॅनर्जी पाठ फिरवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच बैठकीला तृणमूल काँग्रेसचे नेतेही गैरहजर राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ६ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीबाबत मला काहीच माहीत नाही. त्या दिवशी माझे राज्यात अनेक नियोजित कार्यक्रम आहेत. मला बैठकीची माहिती असती,तर मी थोडीच कार्यक्रम ठेवला असता?असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

एकीकडे ४ राज्यातील पराभवानंतर 'इंडिया आघाडी' मजबूत करण्याचा प्रयत्न होत असताना ममता बॅनर्जी यांना निमंत्रण नसल्याने चर्चा उधाण आलं आहे. त्यात समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव नाराज असल्याने बैठकीला येण्याची शक्यता कमी असतानाच ममता बॅनर्जी यांची नाराजीही समोर आली आहे.

भाजपविरोधात लढण्यासाठी २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या‘इंडिया'आघाडीच्या बैठकीदरम्यान लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात लढण्याची रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. या आघाडीच्या मुंबईतील बैठकीत भविष्यातील कार्यक्रमाबाबत रुपरेषा आखली होती. तसेच त्यासाठी समितीचीही स्थापना करण्यात करण्यात आली होती.

विभाग

पुढील बातम्या