मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mallikarjun Kharge : पंतप्रधान मोदी म्हणजे विषारी साप, संपर्कात येणाऱ्याचं मरण नक्की; खर्गेंच्या विधानामुळं राडा

Mallikarjun Kharge : पंतप्रधान मोदी म्हणजे विषारी साप, संपर्कात येणाऱ्याचं मरण नक्की; खर्गेंच्या विधानामुळं राडा

Apr 28, 2023, 09:25 AM IST

  • Mallikarjun Kharge on Narendra Modi : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना विषारी सापाशी केली  आहे.

Mallikarjun Kharge

Mallikarjun Kharge on Narendra Modi : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना विषारी सापाशी केली आहे.

  • Mallikarjun Kharge on Narendra Modi : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना विषारी सापाशी केली  आहे.

Mallikarjun Kharge on Narendra Modi : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान १५ दिवसांवर आल्यामुळं प्रचाराला वेग आला आहे. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना प्रचारात झोकून दिलं असून भाजपवर जोरदार हल्ले सुरू आहेत. या साऱ्या रणधुमाळीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळं मोठा राजकीय राडा सुरू झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

निवडणूक कर्नाटकात होत असली तरी केंद्र सरकारमधील अनेक मंत्री व भाजपशासित राज्यातील मंत्रीही प्रचारात उतरले आहेत. कानडी मतदारांसमोर केंद्रातील कामाचा पाढाही वाचला जात आहे. त्यामुळं साहजिकच केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी हे काँग्रेसच्या टीकेच्या रडारवर आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज मोदींवर टीका करताना त्यांना सापाची उपमा दिली. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साप आहेत. तुम्ही म्हणाल ते विषारी आहेत की बिनविषारी? तर त्याचं उत्तर आहे की संपर्कात आलात मरण नक्की, असं खर्गे म्हणाले.

Uddhav Thackeray : स्वत: जागा सुचवूनही आता बारसू रिफायनरीला विरोध का?; उद्धव ठाकरेंनी केला खुलासा

खर्गे यांच्या या वक्तव्यावरून आता भाजप व काँग्रेसमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. भाजपनं खर्गे यांची ही टिप्पणी निवडणुकीचा मुद्दा बनवण्याची तयारी केली आहे. भाजपनं सोनिया गांधी यांच्या 'मौत का सौदागर' या टीकेची आठवण देत काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. काँग्रसेची पातळी अधिकच घसरत चालली आहे. पाण्याविना माशासारखी त्यांची अवस्था आहे. काँग्रेस सत्तेसाठी तडफडत असून खर्गेंच्या विधानातून हीच निराशा दिसत आहे, अशी टीका भाजपनं केली आहे.

मोदी विरुद्ध काँग्रेस

कर्नाटकच्या संदर्भातील आतापर्यंतच्या जनमत चाचण्यांनुसार भाजपला इथली सत्ता गमवावी लागणार आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर ठेवून निवडणूक जिंकणं कठीण असल्याचं भाजपच्या लक्षात आलं आहे. बंडखोरी हा देखील एक महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. त्यामुळंच ही निवडणूक मोदी विरुद्ध काँग्रेस अशी करण्याची भाजपची रणनीती होती. खर्गे यांच्या विधानामुळं भाजपला ही संधी दिली आहे. त्याचा वापर ते कसा करतात यावर बरंच काही अवलंबून असणार आहे.

Sharad pawar : “आता भाकरी फिरवण्याची वेळ आलीय..”, शरद पवारांच्या विधानाने चर्चेला उधाण; अजित पवार म्हणाले…

 

खर्गेंचा खुलासा

या वक्तव्यावर भाजपकडून चौफेर टीका होताच खर्गे यांनी घूमजाव केलं आहे. 'मी व्यक्तिगत टीका करत नाही. भाजपची विचारधारा विषारी आहे. तुम्ही त्यांना पाठिंबा दिला तर तुमचा अंत नक्की असं माझं म्हणणं होतं, असं खर्गे म्हणाले.

पुढील बातम्या