मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gandhi Jayanti: भारतीय नोटांवर गांधीजींचा फोटो पहिल्यांदा कधी छापला गेला? वाचा

Gandhi Jayanti: भारतीय नोटांवर गांधीजींचा फोटो पहिल्यांदा कधी छापला गेला? वाचा

Oct 02, 2023, 08:17 AM IST

  • Mahatma Gandhi Photo On Indian currency: २ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी यांची १५४वी जयंती साजरी केली जाईल.

₹2000 Currency Note (PTI)

Mahatma Gandhi Photo On Indian currency: २ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी यांची १५४वी जयंती साजरी केली जाईल.

  • Mahatma Gandhi Photo On Indian currency: २ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी यांची १५४वी जयंती साजरी केली जाईल.

Gandhi Jayanti 2023 : देशात दरवर्षी २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. अहिंसक पद्धतींने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधी यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या महात्मा गांधी यांचा फोटो भारतीय चलनातील नोटांवर छापण्यात आला. परंतु, महात्मा गांधी यांचा फोटो पहिल्यांदा नोटांवर कधी छापण्यात आला आणि त्यांचा फोटो काढणारा फोटोग्राफर कोण होता? हे बहुतेक लोकांना माहिती नाही. याबाबत आज जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

महात्मा गांधींचे यांचे अनेक फोटो हेन्री कार्टियर-ब्रेसन, मार्गारेट बोर्के-व्हाइट आणि मॅक्स डेसफोर यांनी काढले. भारतीय नोटांवर गांधीजींचा छापलेला फोटो ब्रिटीश काळातील आहे. हा फोटो १९४६ रोजी काढण्यात आला होता, जेव्हा ब्रिटिश नेते लॉर्ड फ्रेडरिक विल्यम पेथिक-लॉरेन्स गाधींजींना भेटायला गेले होते.

दरम्यान, अनेकांना असाही प्रश्न पडतो की, नोटावर छापण्यासाठी गांधीजींचा हाच फोटो का निवडण्यात आला. त्यामागचे कारण म्हणजे, या फोटोमधील गांधींचे स्मित खूप लोकांना आवडले होते. चष्मा घातलेले आणि थोडासा तिरका चेहरा यामुळे त्यांना हे फोटो निवडण्यास भाग पाडले. मात्र, गांधीजींचा हा फोटो कोणी काढले होते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

गांधीजींच्या जन्मानंतर सुमारे १०० वर्षांनी म्हणजेच १९६९ मध्ये पहिल्यांदा महात्मा गांधीचा फोटो भारतीय नोटावर छापण्यात आला. आरबीआयचे माजी गव्हर्नर एलके झा यांच्या स्वाक्षरीखाली गांधीजींच्या १००व्या जयंतीनिमित्त भारतीय नोटांवर गाधींजीचा फोटो छापण्यात आला. सुरुवातीला गांधींजीचा फोटो १० आणि १०० रुपयांच्या नोटावर छापण्यात आला. यानंतर १९९७ मध्ये ५० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनात आल्या. २००१ मध्ये पाच आणि २० रुपयांच्या नोटांची छपाई करण्यात आली. या सगळ्या नोटांवर गांधीजींचा फोटो छापण्यात आला.

विभाग

पुढील बातम्या