मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Shahid Diwas : …आणि ३० जानेवारी ‘शहीद दिवस’ म्हणून ओळखला जाऊ लागला!

Shahid Diwas : …आणि ३० जानेवारी ‘शहीद दिवस’ म्हणून ओळखला जाऊ लागला!

Jan 30, 2023, 05:17 PM IST

  • Mahatma Gandhi Death Anniversary : हा दिवस गांधीजींची पुण्यतिथी म्हणून इतिहासात कायमचा नोंदवला गेला. पण गांधी पुण्यतिथी व्यतिरिक्त ३० जानेवारी हा दिवस खास का आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

महात्मा गांधी पुण्यतिथी (हिंदुस्तान टाइम्स)

Mahatma Gandhi Death Anniversary : हा दिवस गांधीजींची पुण्यतिथी म्हणून इतिहासात कायमचा नोंदवला गेला. पण गांधी पुण्यतिथी व्यतिरिक्त ३० जानेवारी हा दिवस खास का आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

  • Mahatma Gandhi Death Anniversary : हा दिवस गांधीजींची पुण्यतिथी म्हणून इतिहासात कायमचा नोंदवला गेला. पण गांधी पुण्यतिथी व्यतिरिक्त ३० जानेवारी हा दिवस खास का आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

Mahatma Gandhi Death Anniversary : महात्मा गांधी अर्थात मोहनदास करमचंद गांधी यांची आज ७५वी पुण्यतिथी आहे. हा दिवस महात्मा गांधींच्या अहिंसेच्या शिकवणीसाठी विशेष ओळखला जातो. हिंसेपेक्षा अहिंसा हे एक सर्वात मोठं शस्त्र आहे आणि त्या शस्त्राच्या आधारे मोठमोठी युद्ध बंदुकीशिवाय जिंकता येतात हे महात्मा गांधींनी जगाला पटवून दिलं. महात्मा गांधींना कोणी बापू म्हणूनही हाक मारतात. सत्य आणि अहिंसेचा मार्ग सर्वात सुंदर आणि खरा मार्ग आहे याची शिकवण महात्मा गांधी यांनी करून दिली.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींनी राष्ट्रपिता या उपाधीने गौरवण्यात आलं. गांधीजींच्या प्रयत्नांनी देश १५ ऑगस्ट १९४७ साली स्वतंत्र झाला. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर काहीच दिवसात ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांचे निधन झाले. गांधीजींना नथुराम गोडसेने बिर्ला हाऊसमधील गांधी स्मृती येथे संध्याकाळी प्रार्थनेदरम्यान गोळ्या घातल्या. हा दिवस गांधीजींची पुण्यतिथी म्हणून इतिहासात कायमचा नोंदवला गेला. पण गांधी पुण्यतिथी व्यतिरिक्त ३० जानेवारी हा दिवस खास का आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

३० जानेवारीला पाळला जातो हुतात्मा दिन

भारतात ३० जानेवारी हा शहीद दिन म्हणून साजरा करतात. एके ठिकाणी बापूंची पुण्यतिथी शहीद दिन म्हणून साजरी करून, देश महात्मा गांधींना आदरांजली वाहतो. यावेळी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री दिल्लीतील राजघाटावर गांधीजींच्या समाधीवर पोहोचतात आणि गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहतात. तर दुसरीकडे देशाच्या सशस्त्र दलातील हुतात्म्यांना अभिवादन केले जाते. बापूंच्या स्मरणार्थ आणि शहीदांच्या स्मरणार्थ देशभरात दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले.

२३ मार्चचा हुतात्मा दिन आणि या दिवसात काय आहे फरक

३० जानेवारी व्यतिरिक्त, २३ मार्च हा देखील भारतात शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. दोन वेगवेगळ्या तारखांना हुतात्मा दिन साजरा करण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. पण दोन्ही हुतात्मा दिनात फरक आहे. ३० जानेवारी रोजी महात्मा गांधींची हत्या झाली, तर स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली. म्हणूनच अमर शहीद दिन २३ मार्च रोजी अमर शहीदांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

या तारखांनाही पाळला जातो शहीद दिवस

३० जानेवारी - महात्मा गांधी यांची पुण्यतिथी शहीद दिन म्हणून साजरी केली जाते.

१४ फेब्रुवारी - गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या ४१ सैनिकांच्या स्मरणार्थ शहीद दिन साजरा केला जातो.

२३ मार्च - या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ब्रिटीश सरकारने फाशी दिली.

२१ ऑक्टोबर - पोलीस शहीद दिन किंवा पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो.

२४ नोव्हेंबर - १६७४ मध्ये औरंगजेबाने फाशी दिलेले गुरु तेग बहादूर यांच्या स्मरणार्थ शहीद दिन साजरा केला जातो.

विभाग

पुढील बातम्या