मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  आता सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पाहा LIVE

आता सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पाहा LIVE

Sep 26, 2022, 11:54 PM IST

    • सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट (Supreme court live streaming) प्रक्षेपण होणार आहे. पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची (Maharashtra political crisis) सुनावणी लाईव्ह होणार आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पाहा LIVE

सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट (Supreme court live streaming) प्रक्षेपण होणार आहे. पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची (Maharashtra political crisis) सुनावणी लाईव्ह होणार आहे.

    • सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट (Supreme court live streaming) प्रक्षेपण होणार आहे. पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची (Maharashtra political crisis) सुनावणी लाईव्ह होणार आहे.

नवी दिल्ली - उद्यापासून सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट (Supreme court live streaming) प्रक्षेपण होणार आहे. पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची (Maharashtra political crisis) सुनावणी लाईव्ह होणार आहे. देशाच्या दृष्टीने हे महत्वपूर्ण पाऊल असून सर्वसामान्य नागरिकांना घरबसल्या कोर्टाचे काम पाहता येणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी उद्या (२७ सप्टेंबर) सर्वाच्च न्यायालयात होणार आहे. विशेष म्हणजे ही सुनावणी देशातील जनतेला घरबसल्याही बघता येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

सर्वाच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या सुनावण्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग उद्यापासून होणार आहे.पहिल्या दिवश म्हणजे मंगळवारी ज्या घटनापीठाच्या सुनावण्यांचे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे, त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षण, महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष तसेच दिल्ली विरुद्ध केंद्र सरकार यांच्यातील सुनावण्यांचा समावेश आहे. घटनापीठाच्या सुनावण्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचा निर्णय कोर्टाच्या बैठकीत झाला आहे.

गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी प्रलंबित आहे. याची सुनावणी उद्या होणार आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. उद्या होणाऱ्या सुनावणीच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील प्रकरण दुसऱ्या क्रमाकांवर आहे. ७ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश दिले होते. त्यामुळे उद्याच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मोठा निर्णय देण्याची आवश्यकता आहे.

महाराष्ट्रातील १२ आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा,राज्यपाल व विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार, पक्षांतरबंदी कायदा आदि मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर खरी शिवसेना कुणाची याचाही निर्णय उपेक्षित आहे.

पुढील बातम्या