मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  mahakal temple fire : उज्जैनच्या महाकाल मंदिरात मोठी दुर्घटना; होळी खेळताना गर्भगृहात आग, १३ पुजारी होरपळले

mahakal temple fire : उज्जैनच्या महाकाल मंदिरात मोठी दुर्घटना; होळी खेळताना गर्भगृहात आग, १३ पुजारी होरपळले

Mar 25, 2024, 10:38 AM IST

  • ujjain mahakaleshwar mandir fire : उज्जैनच्या महाकाल मंदिरात मोठी दुर्घटना घडली. येथे होळी सण साजरा करण्यात येत असतांना गर्भगृहात अचानक आग लागली. आगीची घटना समजताच तेथे उपस्थित भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली

उज्जैनच्या महाकाल (ujjain fire) मंदिरात मोठी दुर्घटना घडली. येथे होळी सण साजरा करण्यात येत असतांना गर्भगृहात अचानक आग लागली.

ujjain mahakaleshwar mandir fire : उज्जैनच्या महाकाल मंदिरात मोठी दुर्घटना घडली. येथे होळी सण साजरा करण्यात येत असतांना गर्भगृहात अचानक आग लागली. आगीची घटना समजताच तेथे उपस्थित भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली

  • ujjain mahakaleshwar mandir fire : उज्जैनच्या महाकाल मंदिरात मोठी दुर्घटना घडली. येथे होळी सण साजरा करण्यात येत असतांना गर्भगृहात अचानक आग लागली. आगीची घटना समजताच तेथे उपस्थित भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली

Ujjain Mahakaleshwar Mandir Fire : मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात भीषण दुर्घटना घडली आहे आहे. उज्जैनच्या महाकाल मंदिरात सोमवारी भस्म आरती सुरू असताना गर्भगृहात अचानक आग लागली. या घटनेत १३ पुजाऱ्यासह काही भाविक होरपळले आहेत. या घटनेनंतर तातडीने मंदिराचा नंदी हॉल रिकामा करून भस्म आरतीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांना बाहेर काढण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

गर्भगृहात आग लागल्याचे समजताच तेथे उपस्थित भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. यानंतर जिल्हा रुग्णालयातून तात्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारानंतर चौघांना इंदूरला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. तर उर्वरित लोकांवर उज्जैन येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुलाल उधळल्याने आग भडकली

गर्भ गृहात आरती सुरू होती. यावेळी काही भाविक आणि पूजऱ्यांनी आरतीदरम्यान गुलाल उधळला. यामुळे आग भडकली असल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागली तेव्हा मंदिरात हजारोंच्या संख्येने भाविक महाकाल मंदिरात होळी साजरी करण्यासाठी जमले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पुजारी गर्भगृहात आरती करत असताना मागून कोणीतरी गुलाल उधळला. गुलाल दिव्यावर पडला. गुलालात काही रसायन असल्याने आग भडकली.

गर्भगृहात असलेल्या चांदीच्या आवरण रंगापासून खराब होऊ नये यासाठी अंबाडी लावली जाते. यामुळेही आग लागल्याचे काहींनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच उपस्थित असणाऱ्या भाविकांपैकी काहींनी अग्निशमन यंत्राच्या साह्याने आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गर्भगृहात आरती करत असलेले संजीव पुजारी, विकास, मनोज, सेवाधारी आनंद, कमल जोशी यांच्यासह १३ जण भाजले.

चौकशीचे आदेश

उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज सिंह यांनी सांगितले की, या घटनेत 13 जण होरळपले आहे. यातील ४ जणांना इंदूरला उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी समिती स्थापन करण्यात येत आहे. उर्वरित जखमींवर उज्जैनच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुढील बातम्या