मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 23 May 2023: डॉ.कश्मिरा संखेनं घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट
Kashmira Sankhye

Live News Updates 23 May 2023: डॉ.कश्मिरा संखेनं घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

May 23, 2023, 11:33 PMIST

Kashmira Sankhye: ठाण्याच्या डॉ.कश्मिरा संखे हिने युपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे.

May 23, 2023, 07:20 PMIST

Video: यूपीएससी परीक्षेत इशिता किशोर देशात प्रथम

Video: यूपीएससी परीक्षेत दिल्लीची इशिता किशोर देशात प्रथम

May 23, 2023, 04:48 PMIST

Mumbai: दक्षिण यात्रेसाठी भारत गौरव पर्यटक ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रवाना

श्री रामेश्वरम-तिरुपती: दक्षिण यात्रेसाठी भारत गौरव पर्यटक ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आज रवाना झाली. ही ट्रेन वर्तुळाकार मार्गाने प्रवास करेल. या ट्रेनच्या टूर पॅकेजमध्ये म्हैसूर, बेंगळुरू, कन्याकुमारी, तिरुअनंतपुरम, रामेश्वरम, मदुराई आणि तिरुपती यांसारख्या ठिकाणांना समावेश आहे. १० रात्री आणि ११ दिवसांचा हा प्रवास असेल. ०२ जून २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे परत येईल.

Mumbai: दक्षिण यात्रेसाठी भारत गौरव पर्यटक ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रवाना
Mumbai: दक्षिण यात्रेसाठी भारत गौरव पर्यटक ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रवाना

May 23, 2023, 03:08 PMIST

ALD Automotive :  एएलडी ऑटोमोटिव्हने लीजप्लॅनचे केले अधिग्रहण

एएलडी ऑटोमोटिव्हने लीजप्लॅनचे १००% अधिग्रहण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. लीजप्लॅन ही मोबिलिटी क्षेत्रातील जगातील एक कंपनी आहे. एएलडी ऑटोमोटिव्हने टीडीआर कॅपिटलच्या नेतृत्वाखालील एका कंपनी समूहाकडून लीजप्लॅनचे अधिग्रहण केले आहे.

May 23, 2023, 02:52 PMIST

PIL 2000 note exchange : केवायसीशिवाय २००० नोटा बदलण्यासंदर्भातील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने ठेवला राखून

२००० रुपयांच्या नोटा केवायसीशिवाय बदलण्याची परवानगी देणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारतीय स्टेट बँकेच्या अधिसुचनेला आव्हान देणाऱ्या एका जनहित याचिकेवरील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी राखून ठेवला आहे.

May 23, 2023, 12:06 PMIST

Vedanta : वेदांताने पुन्हा एकदा जाहीर केला लाभांश 

वेदांताने आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी पहिल्यांदा लाभांश देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने २२ मे रोजी सांगितले की, एका गुंतवणूकदाराला १८०० टक्के लाभांश मिळणार आहे. रेकाॅर्ड डेट मे महिन्यात आहे.

May 23, 2023, 10:25 AMIST

डॉ. मोहन भागवतांना भेटल्यानंतर वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा : नाना पटोले

वादग्रस्त सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते वानखेडेंचा बचाव करण्यासाठी सरसावले आहेत. समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपुरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटले व त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे, हे संशयास्पद वाटते, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

डॉ. मोहन भागवतांना भेटल्यानंतर वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा : नाना पटोले
डॉ. मोहन भागवतांना भेटल्यानंतर वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा : नाना पटोले

May 23, 2023, 10:26 AMIST

Arvind Kejriwal : दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज मुंबईत येणार आहेत. मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे स्वागत केले जाणार आहे. या दौऱ्यात ते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. 

May 23, 2023, 10:06 AMIST

उद्धव ठाकरेंचा जयंत पाटलांना फोन; जयंत पाटलांच्या ईडी चौकशीबाबत केली विचारणा

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीने तब्बल साडे नऊ तास सोमवारी चौकशी केली. यानंतर आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी  जयंत पाटील यांना फोन करत  जयंत पाटलांच्या ईडी चौकशीबाबत केली विचारणा केली. 

May 23, 2023, 09:10 AMIST

Pune : मराठी माणसाच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक, आज पुणे मेट्रो विरोधात आंदोलन

पुणे मेट्रो मध्ये कामगार भरती साठी बिहार राज्यातील पाटणा येथे मुलाखतीचा कार्यक्रम घेतल्याने महाराष्ट्रातील मराठी तरुणांच्या हक्काचा रोजगार हिसकावून जात असल्याने या विरोधात मनसे आक्रमक झाले असून आज दुपारी ३.३० वाजता पुणे मेट्रो प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले जाणार आहे.

May 23, 2023, 08:30 AMIST

Pune Water supply : पुण्याच्या पाणी पुरवठ्यात मोठा बदल; गुरूवारी नव्हे तर विभागवार पद्धतीने पाणीबंदचा निर्णय

Pune Water supply : पाणी बचतीसाठी पुण्यात पाणी कपात लागू करण्यात आली होती. ही कपात दर गुरुवारी होणार होती. मात्र, यात बदल करण्यात आला असून आता दर गुरुवार एवजी विभागवार पाणी कपात केली जाणार आहे.

May 23, 2023, 08:03 AMIST

2000 Rupees Note Exchange : आज पासून २ हजारांची नोटबदली सुरू

2000 Rupees Note Exchange: १९ मे रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्या. या नोटा आज २३ मे पासून ते 30 सप्टेंबर पर्यंत बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन बदलून घेता येणार आहे.

May 23, 2023, 06:51 AMIST

Sharad Pawar : पंतप्रधान पदाबाद शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले 'मी शर्यतीत..'

Sharad Pawar news : देशात भाजपविरोधी विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. यात शरद पवार यांची भूमिका महत्वाची आहे. यामुळे पंतप्रधान पदाबाद शरद पवार हे कायम दावेदार राहिले आहे. मात्र, या पदाबाबत त्यांनी सोमवारी एका कार्यक्रमात मोठे विधान केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

May 23, 2023, 06:26 AMIST

Pune : Pune Crime : पुणे हादरले ! कुटुंबातील तिघांचा विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न; वडिलांचा मृत्यू,आई गंभीर

 पुण्यात आर्थिक विवंचनेतून आणि नैराश्य आणि आजारपणाला कंटाळून एका कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री फुरसुंगीमधील लक्ष्मी निवास येथे घडली. यात वृद्ध वडिलांचा मृत्यू झाला तर आईची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

May 23, 2023, 06:08 AMIST

अभियानाची व्याप्ती वाढवा, सर्वाना सहजपणे लाभ मिळावेत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  शासन आपल्या दारी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महालाभार्थी पोर्टलचा उपयोग करून घेण्यात येणार असून यामुळे या योजनेची व्याप्ती वाढणार आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे एक सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जास्तीत जास्त नागरिकांना सहज सुलभ लाभ मिळावेत म्हणून या पोर्टलचा देखील उपयोग व्हा अशी सुचना केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महत्वाच्या सूचना केल्या.

May 23, 2023, 06:08 AMIST

Pune : राज्यात १५ हजार महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्र-समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे

  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी तसेच शासनाच्या विविध योजना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी देशात प्रथमच राज्यातील १५ हजार महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्र समाज कल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.

May 23, 2023, 06:06 AMIST

PM Narendra Modi : हिंद प्रशांत महासागरात चीनच्या दादागिरीला लागणार वेसण; पीएम मोदींनी सांगितला प्लॅन

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या पापुआ न्यू गिनी या देशाच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी आयोजित शिखर संमेलनात मोदींनी सहभागी होत हिंद प्रशांत महासागरातील चीनच्या दादागिरीला वेसण घालण्यासाठी १२ मुद्दे मांडत नवी रणनीती जाहीर केली.

    शेअर करा