मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 19 June 2023 : इम्रान खान यांना अटक होणार; व्हिडिओ ट्विट करत म्हणाले,'मी खरा पाकिस्तानी'
Live News Updates (HT)

Live News Updates 19 June 2023 : इम्रान खान यांना अटक होणार; व्हिडिओ ट्विट करत म्हणाले,'मी खरा पाकिस्तानी'

Jun 19, 2023, 09:59 PMIST

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. त्यांना तोशखाना प्रकरणी चौकशीसाठी पुन्हा बोलावण्यात आले होते. या प्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. तत्पूर्वी त्यांनी व्हिडिओ ट्विट करत स्वत: ला 'मी खरा पाकिस्तानी' असल्याचे संबोधले.

Jun 19, 2023, 09:59 PMIST

राजस्थान: अजमेर शहरात प्रचंड पाऊस

राजस्थानातील अजमेर शहरात आज, सोमवारी प्रचंड पाऊस पडला. परिणामी शहरातील अनासागर तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. या तलावाचे पाणी आजूबाजूच्या नागरी वस्त्यांमध्येही शिरले होते. 

Jun 19, 2023, 07:29 PMIST

नांदेडमध्ये ऑटो- ट्रकची समोरासमोर धडक; ४ जणांचा मृत्यू

नांदेडच्या भोकर- नांदेड रस्त्यावर टाटा मॅजिक आणि विटांची वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक होवून मोठा अपघात झाला. सिताखंडी घाटात हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. टेम्पो चालकाचे नियत्रंण सुटल्याने भोकरकडे जाणाऱ्या प्रवाशी टाटा मॅजिकला या टेम्पोने जोराची धडक दिली. 

Jun 19, 2023, 05:37 PMIST

‘गीता प्रेस’ या प्रकाशन संस्थेला ‘गांधी शांती पुरस्कार’ जाहीर

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील ‘गीता प्रेस’ या प्रकाशन संस्थेला ‘गांधी शांती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने हा पुरस्कार जाहीर केला आहे. 

Jun 19, 2023, 04:38 PMIST

NVision energy :  अक्षय उर्जा निर्मितीसाठी एन व्हिजन एनर्जीला मिळाली आॅर्डर

अक्षय ऊर्जा उपाय सुविधांमध्ये जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या एनव्हिजन एनर्जीने सेरेंटिका रिन्युएबल्सकडून मोठी ऑर्डर मिळवली आहे. सेरेंटिका रिन्युएबल्सएक एक डीकार्बोनायझेशन प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्रातील आगामी ३५० मेगावॅटच्या विंड पार्कसाठी विंड टर्बाइन जनरेटरचा पुरवठा आणि कार्यान्वित करण्यासाठी ऊर्जा-केंद्रित उद्योगांकरिता ऊर्जा संक्रमणाला गती देण्याचे काम हा प्लॅटफॉर्म करतो. १५६ मीटरचा रोटर व्यास, १४० मीटरची हब उंची आणि ३.३ मेगावॅटची रेटेड क्षमता यांसह एनव्हिजनचे १०६ अत्याधुनिक इन १५६ /३.३ विंड टर्बाइन जनरेटर्स विंड पार्कमध्ये बसविले जातील. या टर्बाइनचा चीन आणि व्हिएतनाममध्ये एक सिद्धहस्त ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि ते भारतात प्रचलित असलेल्या पवन प्रणालीसाठी सर्वात चांगल्या प्रकारे डिझाइन केलेले आहेत.

Jun 19, 2023, 04:29 PMIST

UCC : समान नागरी कायद्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या तोंडी मुस्लिम लीगची भाषा - भाजप

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समान नागरी कायद्यामुळं हिंदूंना त्रास होणार असल्याचं सांगितलं असून त्यांचं हे वक्तव्य घटना समितीत समान नागरी कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वाला विरोध करणाऱ्या मुस्लिम लीगच्या नेत्याप्रमाणंच आहे. देशहिताच्या महत्त्वाच्या विषयावर मुस्लिम लीगची भाषा बोलणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आता तरी आपण हिंदुत्व सोडलं नाही असं सांगू नये, अशी टीका भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी सोमवारी मुंबईत केली.

Jun 19, 2023, 04:23 PMIST

Supriya Sule : दर्शना पवार मृत्यू प्रकरणाचा योग्य तपास करून तिला न्याय द्या, सुप्रिया सुळे यांची मागणी

एमपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्या दर्शना पवार या मुलीचा मृतदेह किल्ले राजगडाच्या पायथ्याला सापडला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. प्रशासकीय सेवेत रुजू होण्यापूर्वी ही घटना घडली हे अतिशय खेदजनक आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी योग्य दिशेनं तपास करून दर्शनाला न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Jun 19, 2023, 04:27 PMIST

Closing bell : नफावसुलीच्या दबावाखाली सेन्सेक्स निफ्टीत घसरण

सोमवारी व्यावसायिक सप्ताहाच्या पहिल्या सत्रात देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स २१६.२८ अंकांनी म्हणजेच ०.३४ टक्क्यांनी घसरून ६३,१६८.३० अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी ७०.५५ अंकांनी म्हणजेच ०.३७ टक्क्यांनी घसरून १८,७५५.४५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. अदानी एंटरप्रायझेसचे समभाग निफ्टीमध्ये ३.९१ टक्क्यांनी घसरून २,४११.४५ रुपयांवर बंद झाले.

ऑटो, बँक, रिअल इस्टेट, पॉवर, कॅपिटल गुड्स, रिअल इस्टेट आणि एफएमसीजी निर्देशांकात अर्धा टक्क्यांची घसरण झाली. त्याच वेळी, पीएसयू बँक निर्देशांकात ०.४ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर आयटी निर्देशांकात ०.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले.

Jun 19, 2023, 03:57 PMIST

ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रवी सिन्हा रॉ चे नवे प्रमुख

जेष्ठ आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची ‘रिसर्च अँड अॅनालिसीस विंग’ अर्थात ‘रॉ’ या गुप्तचर संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 'रॉ'चे मावळते प्रमुख सामंत कुमार गोयल यांच्याकडून ते सूत्र हातात घेतील. सिन्हा हे १९८८ सालच्या छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते दिल्लीत केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत.

Jun 19, 2023, 10:59 AMIST

Pune  : भारतीय वारसा का आक्रसला याचा अभ्यास व्हावा : शेफाली वैद्य

विवेकानंद केंद्र कन्याकुमारी च्या मराठी प्रकाशन विभागातर्फे निर्मित, दीपाली पाटवदकर लिखित 'देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पुण्यात लेखक  समीक्षक  शेफाली वैद्य, लेखक अभिजित जोग तसेच साप्ताहिक विवेकच्या संपादक  अश्विनी मयेकर, किरण कीर्तने यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी सहा वाजता स्वा. सावरकर अध्यासन केंद्र  येथे हा कार्यक्रम झाला.

Jun 19, 2023, 10:57 AMIST

Pune : आझम कॅम्पसमध्ये २१ जून रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' चे आयोजन;  दोन हजार विद्यार्थी - विद्यार्थिनी योग प्रात्यक्षिके सादर करणार

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे बुधवार, दिनांक २१ जून रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली. संस्थेच्या विद्यालयांमधील दोन हजारहून अधिक विद्यार्थी - विद्यार्थिनी तसेच शिक्षक सहभागी होणार आहेत.हा प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम फंक्शन ग्राऊंड (आझम कॅम्पस) येथे होणार आहे. त्याचा सराव सुरु असल्याचे 'आझम स्पोर्ट्स अकादमी'चे संचालक गुलझार शेख यांनी सांगितले.

Jun 19, 2023, 09:15 AMIST

Opening bell : सेन्सेक्स निफ्टी सुरुवात वाढीने, परकीय गुंतवणूकदारांची सपाटून खरेदी

सोमवारी सकाळी सेन्सेक्सची सुरुवात ६३,४७४.२१ अंश पातळीवर झाली आहे. सेन्सेक्समध्ये ८९.६३ अंशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर निफ्टीतही ४७.३० अंशांची वाढ नोंदवत १८,८७३.३० अंशांची वाढ झाली आहे.जागतिक बाजारात परकीय गुंतवणूकदारांनी जून महिन्यात कोट्यवधी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत.त्यामुळेच सलग दोन सत्रात सेन्सेक्स निफ्टीत वाढ झाली आहे.

Jun 19, 2023, 08:34 AMIST

Shirdi : गणेश सहकारी साखर कारखाना संचालक पदाच्या जागेसाठी मतमोजणी

शिर्डी - आज गणेश सहकारी साखर कारखाना संचालक पदाच्या १९ जागांसाठी मतमोजणी होणार आहे.  सकाळी ९  वाजता राहता तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस भाजप युती अशी लढत असून आजी-माजी महसूल मंत्र्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत.  

Jun 19, 2023, 08:33 AMIST

Kolhapur news : कोल्हापुरात जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांचा छापा; दोघांनी इमारतीवरून मारल्या उड्या; एकाचा मृत्यू

Kolhapur news : कोल्हापुरात एका घराच्या गच्चावर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी दोघांनी घरावरून उड्या मारल्या. यातील एकाचा मृत्यू झाला.

Jun 19, 2023, 07:14 AMIST

shivsena Shinde gat : शिंदे गटाचा गोरेगावमधील नेस्को मैदानावर वर्धापन दिन

शिवसेना शिंदे गटाकडून गोरेगाव येथील नेस्को मैदानावर वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. बंडखोरीनंतर पहिल्यांदाच पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला जातोय. संध्याकाळी ७  वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरूवात होईल.  रात्री ८  वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं भाषण होईल.

Jun 19, 2023, 07:14 AMIST

shivsena uddhv gat : शिवसेना ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा ५७  वा वर्धापन दिन आज षण्मुखानंद सभागृहात संध्याकाळी ६.३०वाजता पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातील पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. वर्धापन दिन सोहळ्याला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.  

Jun 19, 2023, 07:13 AMIST

Shivsena Anniversary: शिवसेनेचा आज ५७  वा वर्धापनदिन; शिंदे गटाकडून शक्तीप्रदर्शनाची तयारी, तर सामनातून शिंदेंवर हल्लाबोल

शिवसेनेचे यंदा दोन वर्धापन दिन सोहळे पार पडणार आहेत. शिवसेनेच्या ५७  वर्षाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मिळाल्यानंतरही ठाकरे गटाकडून आम्हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे दोन्ही गटांकडून आज शिवसेनेचे दोन वेगळे वर्धापन दिन साजरे होणार आहेत. दोन्ही गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे.

Jun 19, 2023, 06:42 AMIST

Imran Khan : इम्रान खान यांना अटक होणार; व्हिडिओ ट्विट करत म्हटले,'मी खरा पाकिस्तानी'

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. त्यांना तोशखाना प्रकरणी चौकशीसाठी पुन्हा बोलावण्यात आले होते. या प्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. तत्पूर्वी त्यांनी व्हिडिओ ट्विट करत स्वत: ला 'मी खरा पाकिस्तानी' असल्याचे संबोधले.

    शेअर करा