मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Karnataka CM Swearing in: सिद्धरामय्या, डीके शिवकुमार यांच्या शपथविधी सोहळ्यात विरोधकांची 'वज्रमूठ'

Karnataka CM Swearing in: सिद्धरामय्या, डीके शिवकुमार यांच्या शपथविधी सोहळ्यात विरोधकांची 'वज्रमूठ'

May 20, 2023, 02:46 PM IST

  • Karnataka CM Swearing in Ceremony - कर्नाटकमध्ये कॉंग्रेसच्या दणदणीत विजयानंतर सिद्धरामय्या यांनी आज मुख्यमंत्रीपदाची तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार यांच्यासह देशभरातील प्रमुख विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली.

Karnataka Swearing in Ceremony

Karnataka CM Swearing in Ceremony - कर्नाटकमध्ये कॉंग्रेसच्या दणदणीत विजयानंतर सिद्धरामय्या यांनी आज मुख्यमंत्रीपदाची तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार यांच्यासह देशभरातील प्रमुख विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली.

  • Karnataka CM Swearing in Ceremony - कर्नाटकमध्ये कॉंग्रेसच्या दणदणीत विजयानंतर सिद्धरामय्या यांनी आज मुख्यमंत्रीपदाची तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार यांच्यासह देशभरातील प्रमुख विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली.

कर्नाटकमध्ये कॉंग्रेसच्या दणदणीत विजयानंतर ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी आज मुख्यमंत्रीपदाची तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार यांच्यासह देशभरातील प्रमुख विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली.

ट्रेंडिंग न्यूज

Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

Fact Check : प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड

Ebrahim raisi : इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू! १७ तासानंतर सापडले हेलिकॉप्टर

EPFO ने क्लेम सेटलमेंट प्रक्रिया केली अधिक सुलभ! नॉमिनीला आधार तपशीलाशिवायही मिळणार PF रक्कम

कर्नाटकात सिद्धरामय्या यांच्या शपथिधी सोहळ्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फ्रंसचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला आणि सिने अभिनेते, मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हासन उपस्थित होते.

राहुल गांधी, प्रियांका गांधीची खास उपस्थिती

बेंगळुरुच्या श्री कांतिरवा स्टेडियममध्ये पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उपस्थित होत्या.

आठ जणांना मंत्रीपदाची शपथ 

यावेळी एकूण ८ कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. यात मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियंक खर्गे, माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांच्यासह केएच मुनियप्पा, केजी जॉर्ज, सतीश जार्किहोली, रामलिंगा रेड्डी आणि जमीर अहमद खान यांचा समावेश आहे.

डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.
पुढील बातम्या