मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  RSS प्रल्हाद जोशींना मुख्यमंत्री करणार, मात्र ते समाजात फूट पाडणाऱ्या ब्राम्हण पंथाचे - कुमारस्वामी

RSS प्रल्हाद जोशींना मुख्यमंत्री करणार, मात्र ते समाजात फूट पाडणाऱ्या ब्राम्हण पंथाचे - कुमारस्वामी

Feb 06, 2023, 11:23 PM IST

  • hd Kumaraswamy claim rss : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एनडी कुमारस्वामी यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर टीका करताना म्हटले की, ते समाजात फूट पाडणाऱ्या ब्राम्हण पंथाचे आहेत. तसेच आरएसएस त्यांना कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री बनवण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

कुमारस्वामी

hdKumaraswamyclaimrss : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एनडी कुमारस्वामी यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर टीका करताना म्हटले की, ते समाजात फूट पाडणाऱ्या ब्राम्हण पंथाचे आहेत. तसेच आरएसएस त्यांना कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री बनवण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

  • hd Kumaraswamy claim rss : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एनडी कुमारस्वामी यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर टीका करताना म्हटले की, ते समाजात फूट पाडणाऱ्या ब्राम्हण पंथाचे आहेत. तसेच आरएसएस त्यांना कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री बनवण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटकमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.  जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांनी आरएसएस वर केंद्रीय मंत्री प्रल्हाद  जोशी  यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी षड्यंत्र रचत असल्याचा आरोप केला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

बर्ड फ्लूचे संकट! केरळनंतर उत्तराखंडमध्ये अलर्ट जारी, प्रत्येक जिल्ह्यातील पक्षांचे नमुने तपासणार

ट्रकच्या धडकेत नोटांच्या बंडलांनी भरलेला 'छोटा हत्ती' पलटला, रस्त्यावर पसरले ७ कोटींची रक्कम

Narendra Modi : भरसभेत पंतप्रधान मोदी ‘या’ महिलेच्या पाया पडले, कोण आहे ही ८० वर्षीय वृद्ध महिला

धक्कादायक.. लग्न मोडल्याने भडकला नवरदेव, वधूचे शीर धडावेगळे करून सोबत नेले

एचडी कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे की, आरएसएस प्रल्हाद जोशी यांना कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री बनवण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी असाही आरोप लावला की, प्रल्हाद जोशी यांना राज्याच्या संस्कृतीचे ज्ञान नाही. ते समाजात फूट पाडण्याचे काम करतात. कुमारस्वामी म्हणाले की, जोशी दक्षिण भारतातील ब्राह्मणांशी संबंधित नाहीत. ते अशा ब्राह्मण संप्रदायाशी संबंधित आहेत ज्यांनी महात्मा गांधींची हत्या केली होती. 

कुमारस्वामींचे वादग्रस्त विधान - 

कुमारस्वामीने वादग्रस्त वक्तव्य करताना म्हटले की, जोशी अशा ब्राह्मण समाजातील नाहीत जे दक्षिण कर्नाटकातील आहेत. ते अशा संप्रदायाचे आहेत, ज्यांनी पेशावरमध्ये देवाची मूर्ती तोडल्या होत्या. यावर भाजपनेही पलटवार केला आहे. कर्नाटक प्रदेश अध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी म्हटले की, माजी मुख्यमंत्र्यांना हे वक्तव्य शोभा देत नाही. 

प्रल्लाद जोशी सध्या केंद्रीय संसदीय कार्यमंत्री, कोळसा व खान मंत्री आहेत तसेच ते कर्नाटकमधील धारवाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. भाजपने म्हटले आहे की, कुमारस्वामींना भीती आहे की, त्यांचा पक्ष विधानसभेत २० जागाही जिंकू शकणार नाही, त्यामुळे ते अशी वक्तव्ये करत आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणूक - 

कर्नाटक विधानसभा निवडणूक मे २०२३ पर्यंत होण्याची शक्यता आहे. कारण कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ २४ मे २०२३ रोजी संपणार आहे. मागील विधानसभा निवडणुका मे २०१८ मध्ये झाल्या होत्या. निवडणुकीनंतर जनता दल (सेक्युलर) आणि काँग्रेसने आघाडी करत सरकार स्थापन केले होते. त्यावेळी एचडी कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले होते.

पुढील बातम्या