मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Karnataka Cm: न लिंगायत न वोक्कालिगा... कर्नाटकी सत्तासंघर्षात बाजी मारणार कुरुबा 'सरदार' !

Karnataka Cm: न लिंगायत न वोक्कालिगा... कर्नाटकी सत्तासंघर्षात बाजी मारणार कुरुबा 'सरदार' !

May 17, 2023, 04:07 PM IST

  • Siddaramaiah vs dk shivakumar : कर्नाटकचे पुढचे सीएम सिद्धारमय्या असतील. तसेच काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे  शिवकुमार  यांना उपमुख्यमंत्री त्याचबरोबर मोठे मंत्रालय देण्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

Siddaramaiah vs dk shivakumar

Siddaramaiahvsdkshivakumar : कर्नाटकचे पुढचेसीएम सिद्धारमय्या असतील. तसेच काँग्रेसचेसंकटमोचकम्हणून ओळखले जाणारे शिवकुमार यांनाउपमुख्यमंत्री त्याचबरोबर मोठे मंत्रालय देण्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

  • Siddaramaiah vs dk shivakumar : कर्नाटकचे पुढचे सीएम सिद्धारमय्या असतील. तसेच काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे  शिवकुमार  यांना उपमुख्यमंत्री त्याचबरोबर मोठे मंत्रालय देण्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

बंगळुरु - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवल्यानंतर सर्वांची नजर मुख्यमंत्री (Karnataka Cm) पदाच्या नावाच्या निर्णयावर लागली आहेत. १० मे रोजी झालेल्या कर्नाटक निवडणुकीचा १३ मे रोजी निकाल जाहीर झाला. मात्र सिद्धारमय्या आणि डीके शिवकुमार (Dk Shivakumar) यांच्यावरून असा पेच निर्माण झाला कि, काँग्रेसला मुख्यमंत्री पद कोणाला सोपवायचे याचा निर्णय लवकर घेता येत नव्हता.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : चौथ्या मजल्यावर पडता पडला बचावला चिमुकला, तु काय करत होती? ट्रोलिंगला कंटाळून आईने संपवले आयुष्य

तेंदूच्या पानांची वाहतूक करणारे पिकअप वाहन दरीत कोसळले, १८ जणांचा मृत्यू; ४ जण जखमी

Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

Fact Check : प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड

सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार जवळपास निश्चित झाले आहे की, कर्नाटकचे पुढचे सीएम सिद्धारमय्या (Siddaramaiah)असतील. तसेच काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री (Karnataka Deputy Cm) त्याचबरोबर मोठे मंत्रालय देल्याचे वृत्त आहे. कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात खास चर्चेचा विषय राहिलेल्या लिंगायत (Lingayat) आणि वोक्कालिगा (Vokkaliga) यांना मुख्यमंत्रीपद न जाता कुरुबा समुदाय  (Kuruba Community) चे सिद्धारमय्या यांनी मुख्यमंत्रीपदी बाजी मारली आहे.

'कुरुबा' चेहऱ्याला मुख्यमंत्री बनवण्याची काय कारणे?

कर्नाटकचे राजकारण सामान्यपणे जाती-जमातीमध्ये विभागलेले दिसून येते. राज्याच्या निवडणूक प्रचारातही हा मुद्दा महत्वपूर्ण होता. कर्नाटकमध्येलिंगायत समुदाय सर्वात मोठा मतदार आहे. त्यामुळे भाजपने या समुदायावर विशेष भर दिला. भाजपचे येदियुरप्पाया जातीचे प्रतिनिधित्व करतात. वोटबँकचा विचार करतालिंगायत समाजाची टक्केवारी सर्वात अधिक म्हणजे १७ टक्के आहे. त्यानंतर वोक्कालिगा १४ टक्के, मुस्लिम वोटबँक १२ टक्के आणि कुरुबा ९ टक्के वोटबँक क्रमश: तिसऱ्या व चौथ्या नंबरवरती आहे.

सिद्धारमैया Vs डीके शिवकुमार, पेचात सापडली काँग्रेस -

कर्नाटकमध्ये मोठा विजय मिळवूनही मुख्यमंत्री कोणाला करावे या निर्णयावरून काँग्रेस पेचात सापडलेली दिसून आली. कारण सिद्धारमय्या व डीके शिवकुमार दोघेही काँग्रेसमधील दिग्गज नेते असून दोघांचेही समर्थक आमदार आक्रमक होते. सिद्धारमय्या राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात तर डीके शिवकुमार सोनिया व प्रियंका यांच्याप्रती निष्ठावान आहेत.

 

निवडणुकीच्या दरम्यानही डीके शिवकुमार तत म्हणत होते की, काँग्रेस कर्नाटकमध्ये जवळपास १४० जागा जिंकेल. निकालानंतर काँग्रेसच्या जागाही याच्या जवळपासच आहेत. काँग्रेसने १३५ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला.

पुढील बातम्या